Friday, July 11, 2008
रासायनिक खतांचा कृत्रीम तुटवडा - शासकीय व राजकीय संरक्षणात व्यापाय्रांकडुन शेतकय्रांची राजरोसपणे लुट सुरू
आशिष बडवे - १२ जुलै
नागपुर - मागील जुन महिन्यात सुरू असलेल्या रासायनिक खताचा अभुतपुर्व तुटवडा पाहता आता व्यापाय्रांनी संधीचा फायदा घेवुन व आपल्या राजकीय प्रस्ताचा वापर करुन सरकारी अधिकाय्रांच्या संगनमताने राजरोसपणे काळाबाजार सुरू केला असुन शेतकय्रांचा अंत सरकारने पाहू नये अन्यथा शेतकरी आपल्या हातात कायदा घेऊन खताचा काळा बाजार करणाय्रा व्यापाय्रांना व त्यांना राजकीय संरक्षण देणाय्रां राजकीय नेत्याला धडा शिकवतील असा निर्वाणीचा ईशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी एकापत्रकाव्दारे दिला आहे. डी. ए. पी. खताची किंमत ४८५ रू असुन अधिकारीच ही बँग ५५० रूपयाला विका अशी मुभा व्यापाय्रांना देत असुन पोलीस संरक्षणात हे व्यापारी शेतकय्रांकडुन ६०० रू. प्रती बँग वसुल करीत आहे. जे शेतकरी वरची रक्कम मोजत आहे त्यांना हवा तेवढा डी. ए. पी. चा पुरवठा होत आहे. यामध्येच कृषी केंद्र वाले राजकीय नेत्यांना आपल्या हातात ठेवण्यासाठी त्यांना मात्र रासायनिक खताचा पुरवठा घरपोच करीत असल्याची माहिती शेतकरी नेते सुरेशभाऊ बोलेनवार यांनी दिली. सामान्य अल्पभुधारक शेतकय्रांना मात्र मागील १५ दिवसापासुन दररोज कृषी केंद्रासमोर रांगा लावुन सुध्दा डी. ए. पी. ची बँग मिळत नाही एकीकडे दुबार पेरणीचा फटका व त्यानंतरही खताची अभुतपुर्व अडचण यांच्या मुळे शेतकरी गारद झाले असुन पश्चीम विदर्भातील सर्वच जिल्ह्यात शेतकय्रांमध्ये रासायनिक खताच्या कृत्रीम टंचाईच्या भितीमुळे भयाचं वातावरण निर्माण झाले आहे. ज्या शेतकय्रांना ज्या खताची आज आवश्यकता नाही तो शेतकरी उद्या हे रासायनिक खत मिळणार नाही या भितीने आजचं त्याची अगावु उचल करीत आहे. व या संधीचा फायदा व्यापारी घेत असुन खताचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तरी शेतकय्रांनी आवश्यकते नुसारच खताची खरेदी करावी असे आव्हान सुध्दा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केले आहे.
खताच्या टंचाईमुळे बोगस रासायनिक खताची राजरोसपणे विक्री
सरकारी कंपनीचे खते व चांगली गुणवत्ता असणाय्रा कंपनीचे मिश्र खते बाजारात मिळत नसल्यामुळे मध्यप्रदेश मधल्या नविन नविन कंपन्यांचे रासायनिक खत विकण्याचा सपाटा लागला आहे. या खतामध्ये चुना आणि रेती ८० टक्के असुन शेतकय्रांना मोठ्या प्रमाणात बोगस रासायनिक खतामुळे चुना लागणार आहे. कृषी अधिकारी व प्रशासन यांना या बोगस रासायनिक खताची संपुर्ण माहिती असुन यांच्या संगनमतानेच ही विक्री होत असल्याचा आरोप शेतकरी नेते मोहन मामीडवार व मोहन जाधव यांनी केला आहे. सरकारने रासायनिक खताचा काळाबाजार तात्काळ बंद केला नाही तर शेतकय्रांचे बदडा आंदोलन येत्या सोमवार पासुन सुरू करण्याचा ईशारा विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी दिला आहे.
Thursday, July 10, 2008
विदर्भाच्या शेतकय्रांचे फक्त १० टक्के कर्ज माफ होणार
नागपुर - १० जुलैपश्चीम विदर्भाला ५०७ कोटी तर पश्चिम महाराष्ट्राला ५ हजार ७०० कोटीची कृषी कर्ज माफी देण्यात आली असुन विदर्भाच्या शेतकय्रांचे मात्र फक्त १० टक्के कर्ज माफ होणार असल्याची खळबळजनक माहीती विदर्भ जनआंदोलन समितीने उघडकीस आणली आहे. संपुर्ण जगात ज्या प्रमाणे पश्चीम विदर्भाच्या कापुस उत्पादक शेतकय्रांच्या आत्महत्या २००६ पासुन लक्ष वेधीत होत्या त्याचप्रमाणे आता शेतकय्रांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने घोषीत केलेले ७१ हजार कोटीच्या कर्ज माफीचा गाजावाजा लक्ष वेधुन घेत आहे परंतु अमरावतीच्या विभागीय आयुक्ताने दिलेल्या आकडेवारी वरून पश्चीम विदर्भाच्या आत्महत्याग्रस्त १८ लाख शेतकय्रांपैकी ४ लाख ७ हजार ४३५ अत्यल्प व अल्पभूधारक शेतकय्रांना ५०७ कोटी ४८ लाख ४७ हजार रूपयाचे कर्ज माफी मिळणार आहे. त्याचवेळी पश्चीम महाराष्ट्राच्या नाशिक व पुणे विभागाचे ८ लाख शेतकय्रांचे ५ हजार ७०० कोटी रूपये कृषी कर्ज व २२०० कोटीची कर्ज सवलत मिळत असल्याची अधिकृत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या पश्चिम विदर्भाच्या शेतकय्रांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने कर्ज माफीचा प्रस्ताव आणला त्या शेतकय्रांवरील थकीत कृषी कर्ज माफीनंतरही विदर्भाच्या शेतकय्रांवरील सरकारी व सहकारी बँकांचे कृषी कर्ज ९० टक्के जसेच्या तसे राहील व ही कर्जमाफीसुध्दा एक धुळफेक होणार असुन यामुळे शेतकय्रांची निराशा मोठ्या प्रमाणात होईल व विदर्भातील कापुस उत्पादक शेतकय्रांचे कृषी संकट अधिकच गंभीर होण्याची भिती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना सादर केलेल्या निवेदनातुन व्यक्त केली आहे. सरकारने या कर्ज माफीमुळे विदर्भाच्या शेतकय्रांवरील कर्जाचा बोझा कमी होण्याऐवजी वाढणार असुन सरकारने या सर्व परिस्थीतीवर विचार करून पश्चीम विदर्भाच्या शेतकय्रांवर झालेला अन्याय दुर करावा अशी मागणी सुध्दा केली आहे. पिक कर्ज माफी पश्चीम विदर्भासाठी एक थोतांड पश्चीम विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागात पंतप्रधानांनी १ जुलै २००६ रोजी ८४० कोटीची व्याज माफी दिल्यानंतर नाबार्ड मार्फत २५०० कोटी रूपयाचे पिक कर्ज, थकीत पिक कर्जाचे पुनर्वसन करून १० लाख ६० हजार शेतकय्रांना नविन पिक कर्ज देण्यात आले होते. व या पंतप्रधानाच्या पँकेजमधील व्याज माफीमुळे पश्चीम विदर्भातील ६ लाखावरील शेतकरी मागील वर्षी खांदेपालट करून नविन पिक कर्ज घेतल्यामुळे या पुर्ण कर्ज माफीच्या प्रक्रीयेत वंचीत राहिले. व या शेतकय्रांवरील पिक कर्जाचे ऒझे ३ हजार कोटीच्या वर आहे. मात्र यांना सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही या उलट संपुर्ण कर्ज माफीला ५ एकराची मर्यादा घातल्यामुळे विदर्भातील बहुतेक कर्ज रक्कम भरावी लागणार आहे या उलट या वर्षीचे नविन पिक कर्ज व पुनर्वसन केलेल्या पिक कर्जाचा पहिला हप्ता जुन २००९ पर्यंत भरावयाचा असुन २५ टक्के कर्जमाफीचा फायदा घेवुन हे सर्व शेतकरी कर्जाची परतफेड कशी करतील असा सवाल किशोर तिवारी यांनी केला आहे. ज्या शेतकय्रांनी खांदेपालट करून आपले खाते नियमीत ठेवले त्या शेतकरय्रांना तात्काळ कर्जमाफी देण्याचा निर्णय व्हावा व पश्चीम विदर्भातील आत्महत्याग्रस्त भागातील शेतकय्रांचे सर्व पिक कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी सर्वच शेतकय्रांकडुन होत असुन विदर्भाच्या शेतकय्रांच्या आत्महत्येचा बाजार करून ५ हजार ७०० कोटीची कर्जमाफी लुटणाय्रा पश्चीम महाराष्ट्राच्या नेत्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष द्यावे व विदर्भातील शेतकय्रांवर होत असलेल्या आत्महत्या व कापुस उत्पादकांवरील कृषी संकटावर मात करण्यासाठी साथ द्यावी असे कळकळीचे आवाहन किशोर तिवारी यांनी केले आहे.
Tuesday, July 1, 2008
किशोर तिवारींचे शेतकरी बचाव आंदोलन कोल्हापुरात पोहचले
Saturday, June 28, 2008
पंतप्रधान पँकेजच्या दोन वर्षानंतरही कापुस उत्पादक शेतकरी अडचणीत
बँकांनी पिक कर्ज नाकारलेल्या आणखी ५ शेतकय्रांच्या विदर्भात आत्महत्या
नागपुर (आशिष बडवे) - पंतप्रधानांनी १ जुलै २००६ रोजी ३ हजार ७५० कोटीचे विषेश पँकेज पश्चीम विदर्भाला दिल्यानंतर त्या पँकेजचे तिनतेरा वाजले आहे २९ फेब्रुवारीला ६० हजार कोटींची कर्जमाफी व त्यानंतर विदर्भाच्या शेतकय्राला याचा फायदा होत नाही म्हणुन ती वाढवुन ७१ हजार कोटी रूपयावर नेल्यावरही पश्चीम विदर्भातील ३० लाख नैराश्यग्रस्त कापुस उत्पादक शेतकय्रांना दिलासा देण्यास सरकारला अपयश आले आहे. नैराश्यग्रस्त शेतकय्रांना कर्जाच्या बोझ्यामुळे व बँकांच्या नाकर्तेपणामुळे अद्यापही आत्महत्या कराव्या लागत असुन मागील २ दिवसात गणेश उध्दव माकडे रा. आमगाव जि. बुलडाणा, भाऊराव महादेव ईगळे रा गरूड जि. अमरावती, पांडुरंग मदाळे रा. मोझर जि. यवतमाळ देवराव चव्हाण रा. पाथ्रड जि. यवतमाळ, दिपक अवधुत ऒळंबे रा. खापरवाडी जि. अकोला या ५ शेतकय्रांना आत्महत्या केल्यामुळे पंतप्रधानांच्या पँकेजच्या घोषणेनंतर २२८७ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याची माहीती विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भातील सर्व शेतकय्रांचे कर्ज माफ होत आहे. अशा प्रकारचे संकेत भारताचे कृषी मंत्री शरद पवार यांनी अकोला येथे २० आँक्टोंबर २००७ रोजी दिल्यानंतर बँकेच्या वसुली पुर्णपणे ठप्प झाल्या आहेत. मात्र २९ फेब्रुवारीला सरकारने कर्जमाफी घोषीत केल्यानंतर ५ एकराची अट टाकल्यामुळे ९० ट्क्को शेतकरी कर्ज माफीपासुन वंचीत राहीले. महाराष्ट्र शासनाने व सर्व राजकीय पक्षांनी कर्जमाफीची मर्यादा १५ एकर किंवा सरसकट ५० हजाराचे कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. परंतु सरकारने वाढीव कर्जमाफीमध्ये सुध्दा कापुस उत्पादक क्षेत्राच्या शेतकय्रांना सर्वात कमी कर्ज माफीचा लाभ मिळेल अशाच तरतुदी केल्या आहेत. परीणामी आज पर्यंत विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त कापुस उत्पादक शेतकय्रांना कर्जमाफीचा फायदा मिळाला नाही कारण केंद्र सरकारने ८० टक्के शेतकय्रांना पिक कर्ज देणाय्रा सहकारी बँकांना एक दमडीही उपलब्ध करून दिली नाही याउलट नाबार्ड ने यावर्षी पिक कर्जाच्या पतपुरवठ्यामध्ये मागील वर्षीपेक्षा ५० टक्के रक्कम कमी केल्यामुळे कर्ज माफीचा लाभ मिळुन नविन पिक कर्ज शेतकय्रांना मिळणार नाही हे मात्र निश्चीत झाले आहे सहकारी बँकांसोबत सरकारी बँकांचा सुध्दा नाबार्डने पतपुरवठा रोखुन धरला असुन आम्ही विदर्भातील हवालदिल शेतकय्रांना कर्जमाफीचा फायदा देऊन नविन पिक कर्ज देण्यास असमर्थ असल्याची माहीती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी २७ जुनला मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत दिली आहे असा परिस्थीती ३० जुन पुर्वी कर्जमाफीचा फायदा देवुन नविन पिक कर्जाचे वाटप शेतकय्रांसाठी दिव्य स्वप्न ठरणार असल्याची माहीती किशोर तिवारी यांनी दिली. पंतप्रधानांनी जुलै २००६ मध्ये बँकांना १८४० कोटीची व्याजमाफी दिली होती व नाबार्ड मार्फत २५०० कोटी रूपये पिक कर्जाच्या वाटपासाठी उपलब्ध केले होते त्यावेळी सहकारी व सरकारी बँकांनी पश्चीम विदर्भातील १० लाख ८४ हजार शेतकय्रांना पतपुरवठा केला होता मात्र २००७ मध्ये नाबार्डने पैसा उपलब्ध करून न दिल्यामुळे व बँकांच्या वसुल्या गोठल्यामुळे फक्त ४लाख ३४ हजार शेतकय्रांना बँकांनी नविन पिक कर्ज दिले होते आता सरकारने कर्ज माफीची घोषणा केली आहे मात्र यानंतरही पश्चीम विदर्भातील २ लाख ३२ हजार शेतकरी नविन पिक कर्जाला पात्र होत असुन त्यांना नाबार्डच्या पतपुरवठ्याच्या लक्षा प्रमाणे जेमतेम ७०० कोटी रूपये उपलब्ध होणार असुन ही रक्कम कृषी संकट दुर झाल्यापासुन सर्वात कमी राहणार आहे ही वस्तुस्थीती सी ए जी आपल्या अहवालात दिली होती व शेतकय्रांना पिक कर्ज वाटक करण्यासाठी पत पुरवठा देण्यास बँका असमर्थ असुनही परिस्थीती अजुनही जुलै महिन्याच्या शेवटा पर्यंत सुधारणार नाही अशा परिस्थीतीत ९० टक्के शेतकरी आपली शेती पुन्हा सावकाराच्याच कर्जावर करतील हे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ पंतप्रधानाचे ३ हजार ७५० कोटीचे पँकेजचे तिन तेरा वाजल्यानंतर आता विदर्भात १६०० कोटीचे कर्ज माफीचे पँकेज सुध्दा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्यात जाणार असुन नैराश्यग्रस्त शेतकय्रांच्या आत्महत्येत दुर्दैवाने पुन्हा वाढ होण्याची भिती किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे.
Saturday, June 21, 2008
शासनाने निसर्गसंकट घोषीत करून संकटग्रस्त शेतकय्रांना आर्थिक मदत द्यावी - किशोर तिवारी
शासनाने निसर्गसंकट घोषीत करून संकटग्रस्त शेतकय्रांना आर्थिक मदत द्यावी - किशोर तिवारी
आशिष बडवे
नागपुर - २१ जुन २००८ विदर्भातुनच नाही तर संपुर्ण राज्यातुन पाऊस बेपत्ता झाला असुन कापुस उत्पादकांची पंढरी असलेल्या विदर्भावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. कर्जाच्या ऒझ्याखाली दिवस काढणाय्रा शेतकय्रांनी वेध शाळेचा पावसाचा अंदाज लक्षात घेवुन कर्जाची उचल करून केलेली पेरणी पावसाअभावी वाया गेल्याे त्यांनी कर्जातुन मुक्तीसाठी पुन्हा आत्महत्येचा मार्ग नैराश्येपोटी स्विकारला असुन केळापुर विभागात दोन शेतकय्रांनी दुबारपेरणीच्या संकटामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दुबार पेरणीच्या संकटातुन शेतकरी आत्महत्येचे पेरणीच्या दिवसात सुरू झालेले सत्र थांबविण्यासाठी राज्य शासनाने निसर्गसंकट जाहीर करून संकटग्रस्त शेतकय्रांना तात्काळ आर्थिक मदत घोषीत करावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. विदर्भात यंदा लवकरच पावसाळ्याला सुरूवात होईल असा अंदाज वेधशाळेने वर्तविला होता. त्यानुसार यंदा केरळ मध्ये वेळे पुर्वीच मान्सुन दाखलही झाला. परंतु महाराष्ट्राकडे मान्सुन सरकत असतांना त्याचा जोर कमी होत गेला पुणे, मुंबई आणि कोकण वगळता विदर्भात कोठेही पेरणीयोग्य मोठा पाऊस कोसळला नाही. दरम्यान पावसाळी वातावरण पाहता पुणे येथील वेध शाळेने राज्यात भरपुर वृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला होता त्यानुसार विदर्भात शेतकय्रांनी पेरण्या उरकल्या परंतु मृग नक्षत्र पुर्णपणे कोरडे गेल्याने विदर्भासह राज्यावर दुबार पेरणीचे संकट ऒढवले आहे. कर्ज काढुन पेरणी उरकल्याने व डोक्यावर असलेले शेत कर्ज आणि त्यात दुबार पेरणीचे संकट अशा परिस्थीतीत शेतकय्रांची मानसीक स्थिती बिघडू लागली आहे. या संकटाला सामोरे जाण्याची ताकद शेतकय्रांजवळ उरली नसल्याने शेतकय्रांनी कर्जमुक्तीसाठी आत्महत्येचा मार्ग अंगीकारला आहे त्यातुनच केळापुर विभागात दोन शेतकय्रांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली गारगोटी पोडावरील रामभाऊ भोमु आत्राम वय (३०) व गणीराम कुचा राठोड रा. वासरी ता. घाटंजी अशी त्यांची नावे आहेत. रामभाऊ भोमु आत्राम यांचे आज पांढरकवडा उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आहे. दुबार पेरणीच्या संकटामुळे आत्राम परिवार दुःखाच्या सागरात बुडाला आहे. या निसर्ग संकटातुन शेतकय्रांना वाचविण्यासाठी व संकटग्रस्त शेतकय्रांचे आत्महत्या सत्र नियंत्रीत करण्यासाठी शासनाने तात्काळ निसर्गसंकट जाहीर करून संकटग्रस्त शेतकय्रांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी कळकळीची मागणी विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे ईमेल व्दारे निवेदन पाठविले आहे.
Friday, June 20, 2008
Tuesday, June 17, 2008
"ब्लूमिंगटन-नॉर्मल मधील साठ बालगोपालांनी सादर केले अप्रतिम नाट्यरामायणम्"
कर्ज वसुल करतांना ते वडिलांच्या धाकाने वसुल करावेत - अँड.शरद बनसोडे
सोलापूर दि।१६ : सर्वसामान्य माणासाच्या विकासासाठी त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून पतपुरवठा करणे गरजेचे आहे। मात्र पतसंस्थेने कर्ज देताना आईच्या ममतेने द्यावे व वसुल करताना वडिलांच्या धाकाने करावे असे मत सिनेअभिनेते अॅड। शरद बनसोडे यांनी व्यक्त केले। लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ व्या वागदरी शाखेचे उद्घाटन अॅड।शरद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले हे होते। व्यासपीठावर खासदार सुभाष देशमुख, माजी आमदार महादेव पाटील, जि।प।सदस्य आनंदराव तानवडे, पंचायत समितीचे सदस्य धोंडाप्पा यामानी, पंचायत समितीचे सदस्य मल्लिनाथ हत्ते, भाजपा अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील, दूध डेअरीचे सरव्यवस्थापक रामचंद्र गवळी, शिवशरण कोटे, पंचप्पा कल्याणशेट्टी, वागदरीच्या सरपंच सिंधूताई सोनकवडे, पतसंस्थेचे चेअरमन सुरेश साठे, व्हा।चेअरमन संभाजीराव पाटील, यशवंत साठे आदीं मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक चेअरमन सुरेश साठे यांनी केले। यावेळी माजी जि।प।सदस्य पंचप्पा कल्याणशेट्टी , माजी आमदार महादेव पाटील यांनी विचार व्यक्त केले। पतसंस्थेचे संस्थापक खासदार सुभाष देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आता सरकार काही देईल याची वाट पाहत बसू नका। आपण आपला विकास करून घ्या। मिळविलेल्या चार पैशातून काही तरी बचत करा। गरिबीमुळे समाज व्यसनाकडे वळत आहे आणि व्यसनातून पुन्हा गरिबी निर्माण होत आहे। हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे। आता कुणाच्या तरी हाताकडे पाहण्यापेक्षा अनुदानाची वाट पाहण्यात वेळ घालविण्यापेक्षा तो वेळ शेतीसाठी द्या, व्यवसायासाठी द्या व स्वत:ची प्रगती करून घ्या असे त्यांनी सांगितले। मी अक्कलकोट तालुक्यात पतसंस्थेची शाखा काढतो आहे तेव्हा या मतदारसंघातून मला निवडणूक लढवायची आहे असे नाही। मी विकास कामे करताना कधीच मतदारसंघाचा विचार केला नाही। राजकीय व्यक्तींनी बारा महिने राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। अध्यक्षीय भाषणात आप्पासाहेब चौगुले यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेवून सर्वसामान्यसाठी काम करणारा नेता असे खासदार देशमुख यांचे वर्णन केले। कार्यक्रमास मल्लिनाथ शेळके, मल्लिनाथ हत्ते, शिवशरण वाले, शिवशरण जोजन, यशवंत धोगडे, विजयकुमार पाटील, प्रकाश कोमानी, प्रविण शहा, सचिन कल्याणशेट्टी, अतुल कोकाटे, संतोष मिरगे, डॉ।शेट्टेर, श्रीशैल नंदर्गी, मल्लिनाथ मसुती आदी पतसंस्थेचे सर्व संचालक व सल्लागार तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते। सुत्रसंचालन अनिल सर्जे यांनी केले। आभारप्रदर्शन संचालक मुरारी शिंदे यांनी केले।
लोकमंगल पतसंस्थेतर्फे ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज
सोलापूर दि।१६ राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशनने हमी घेतल्यास परतफेडीच्या तत्वावर लोकमंगल पतसंस्थेतर्फे बार्शी तालुक्यातील ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज तात्काळ मंजूर केले जाईल¸ असे आश्वासन लोकमंगल उद्योगसमुहाचे संस्थापक खा।सुभाष देशमूख यांनी दिले। या महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम बनले पाहिजे आणि ज्या कामासाठी कर्ज घेणार आहे त्याच कामासाठी त्या कर्जाचा वापर करावा असे आवाहन खा।सुभाष देशमूख यांनी यावेळी केले। बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशन सारखा देशव्यापी महासंघ होत असुन त्या माध्यमातून बार्शी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे ¸अशा लोकसंग्रहयूक्त महासंघाच्या माध्यमातून महिला बचत गट व पुरूष बचत गटांच्या मानवी शक्तीचे योग्य नियमन करूण उत्पादन अथवा व्यवसाय करणार आहेत व जे बचत गट उत्पादने करण्यास इच्छूक नाहीत अशांना ट्रेडिंग एजन्सीचे काम देणार असल्याचे खा। सुभाष देशमूख यांनी सांगितले।यावेळी फेडरेशनच्या प्रस्तावावर खा। सुभाष देशमूख यांनी २ कोटी रूपयांचे कर्ज परतफेडीच्या तत्वावर मंजुर केले। या फेडरेशन तर्फे सुविधा सेवा केंद्राची सुरूवात केली असून शासकीय योजना २ महिन्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येक गावामध्ये पोहोचविण्याचे आश्वासन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालाक श्री।जीवनदत्त अरगडे यांनी सांगितले।यावेळी बार्शी तालुक्यातील १०० जणांचे शिष्टमंडळ खा। सुभाष देशमूख यांना भेटण्यास आले होते।
Saturday, June 7, 2008
मोनसान्टो बिटी काँटन भारतीय शेती करीता घातक
Friday, May 9, 2008
लोकमंगल बँक व्याख्यानमाला
Sunday, April 13, 2008
तीन कोटी युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत!
हिंदुत्ववाद्यांचा "कोल्हापूर बंद' शांततेत
कोल्हापूर, ता. १३ ः हिंदुत्ववादी संघटनांनी आज पुकारलेला कोल्हापूर बंद शांततेत पार पडला. कारवाई करताना पोलिसांकडून पक्षपातीपणा होत असल्याच्या कारणावरून हा बंद पुकारला होता. आज रामनवमी असल्याने आंदोलनकर्त्यांनीच रिक्षा आणि बस वाहतूक सुरू ठेवण्यास सवलत दिली. त्यामुळे तुरळक प्रमाणात वाहतूक आणि व्यवहार सुरू राहिले. व्यापाऱ्यांनी मात्र कडकडीत बंद पाळला.
Friday, April 11, 2008
Tuesday, April 8, 2008
पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवात
Friday, April 4, 2008
मातृभुमिच्या पांढरकवडा पानाला ६ एप्रील पासुन प्रारंभ
www.dainikyavatmalnews.com
अकोला येथुन प्रसिध्द होणाय्रा दै. मातृभुमी या वृत्तपत्रात येत्या ६ एप्रील पासुन गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवात होत आहे. अमरावती येथुन प्रसिध्द होणाय्रा एका वृत्तपत्रात यापुर्वी हे पान संपादक अनिरूध्द बडवे हे प्रसिध्द करीत होते या पानाला केळापुर तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग लाभला होता. मात्र यवतमाळ येथील व्यवस्थापनासोबत निर्माण झालेल्या वादामुळे अनिरूध्द बडवे यांनी त्या वृत्तपत्राची ही सेवा बंद केली. मात्र तालुक्यातील वाचकांच्या आग्रहाखातर आता हे विशेष पान लोकप्रीय दै. मातृभुमीत वाचावयास मिळणार आहे. तसेच हे पान इंटरनेट वरही पाहता येणार आहे त्याकरिता वाचकांना फक्त www.dainikyavatmalnews.com या वेब न्युज पेपरवर सर्फिंग करून (log on करून ) पांढरकवडा या पर्यायावर माउस क्लिक करावा लागणार आहे. अधिक माहिती करीता ९४२२१६७२०५ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
NEWS INDIA
NEWS INDIA PRESS
Wednesday, March 26, 2008
गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या
Monday, March 24, 2008
आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारी
आत्महत्या देशाला काळीमा फासणाय्रा - किशोर तिवारी
www.newsindiapress.blogspot.com
www.dainikyavatmalnews.com
राज्य सरकारने चार हजार कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर केला. परंतु कापुस उत्पादक शेतकय्रांना मदत, अन्न सुरक्षा, आरोग्य सुरक्षा व शिक्षणावर सवलत, यासारख्या आत्महत्या रोखण्याच्या उपायावर एक दमडीही दिली नाही. - किशोर तिवारी, अध्यक्ष विदर्भ जनआंदोलन समिती
यवतमाळ - देशातील राजकीय नेते जेव्हा रंगपंचमीच्या रंगात रंगत होते, त्याचवेळी विदर्भातील १० कापुस उत्पादक शेतकय्रांच्या घरात त्यांचे कुटुंबिय आत्महत्येचा शोक व्यक्त करून अश्रृंचा रंग कोणता याचे उत्तर शोधत होते, अशी प्रतिक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. होळी सणाच्या दरम्यान जनआंदोलन समितीला प्राप्त झालेल्या आकडेवाडी नुसार विदर्भातील दहा कापुस उत्पादक शेतकय्रांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली आहे. या आत्महत्या म्हणजे स्वतंत्र भारताला काळीमा फासणारी घटना असल्याचे मत तिवारी यांनी व्यक्त केले आहे. होळी सणाचे दरम्यान ७२ तासात मनोहर शालीग्राम राऊत (अंतरगांव जि. यवतमाळ), विठ्ठल दडमल (रा. गोजी जि. वर्धा), सुखदेव सुरपाडी रा गाढा जि. नागपुर), दिगांबर भिमराव मुळे (रा. गोध्री जि. बुलढाणा), शालिक गोमाजी राऊत (रा. टेंभरी जि. भंडारा), विनोद शेळके (रा. बिरसिंगपुर जि. भंडारा), सुरेश जागृत रा. हिवरखेड जि.बुलढाणा), पांडुरंग धर्मा इंगळे (रा. झोगडा जि. बुलढाणा) प्रमोद फसले (रा. हनवाडी जि. अकोला), पतरू नानाजी वाढई (रा. लेखा जि. गडचिरोली), या विदर्भातील १० कापुस उत्पादक शेतकय्रांनी नापिकी, कर्जबाजीरी पणामुळे आपली जिवनयात्रा संपविली आहे. कर्जमाफिनंतरही विदर्भातील शेतकय्रांचे आत्महत्येचे सत्र थांबलेले दिसुन येत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात, म्हणुन संपुर्ण भारतातील चार कोटी शेतकय्रांना ६० हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतरही सरकार खात्याने दोन हेक्टर व ३१ मार्च २००७ ची अट जाहीर केल्यामुळे विदर्भातील ३४ हजार शेतकरीच कर्जमाफीला पात्र ठरले आहेत. राज्य सरकारने गाजावाजा करून शेतकरी अर्थसंकल्प सादर केला. परंतु, विदर्भातील शेतकय्रांना दमडीही दिली नाही. त्यामुळेच शेतकय्रांच्या आत्महत्येचे सत्र थांबायचे नाव घेत नाही परिणामी शेतकरी आत्महत्येत वाढ होत आहे. कर्जमाफी देतांना देशभरातील ९० टक्के शेतकय्रांना सरकारने वंचीत ठेवले आहे. राज्य सरकार कापुस उत्पादक शेतकय्रांसाठी भरघोस मदत करील अशी आशा शेतकय्रांना होती. परंतु अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा विदर्भातील कापुस उत्पादक शेतकय्रांची निराशाच झाली आहे. अशी टिका किशोर तिवारी यांनी केली. राज्यात आघाडी सरकारच्या कार्यकाळात कापुस उत्पादक शेतकय्रांमध्ये निराशा वाढीस लागली. कर्जबाजारीपणामुळे ८ तासाला एका शेतकय्राने आत्महत्या केली. दरम्यान, विस हजारांवर शेतकय्रांनी आत्महत्या केल्याचेही तिवारी यांनी म्हटले आहे. शेतकय्रांना कापसाचा अग्रीम बोनस म्हणुन प्रती हेक्टर दोन हजार अशी मदत यावर्षी घोषीत करण्यात येईल. तसेच शेतकय्रांच्या सावकारी कर्जाचे पुनर्वसन करण्यासाठी सरकार तरतुद करेल, अशी घोषणा सरकारने केली होती. याकडे जनआंदोलन समितीने लक्ष वेधले आहे.
After Central Govt. now Maharashtra Govt. Budget too failed to address vidarbha agrarian crisis :No relief for food security and health care to Distressed Dying cotton farmers.
Nagpur-19th march 2008
Today Maharashtra govt. too failed to give any relief to vidarbha cotton farmers after big loan waiver of Indian govt. failed to provide any debt relief to more than 90% vidarbha cotton farmers due it's upper cap to 2 hector and cut off date being 30th march,2007 as it was expected that next being election year maharashtra govt. would restore cotton price or announce the rs.2000 per hector subsidy to cotton farmers but finance minister Maharashtra Jayant Patil failed to address this long pending important issue ,kishor tiwari president of vidarbha jan andolan samiti informed in a press release.the amount shown for irrigation project is part of vidarbha backlog and included in the AIBP hence this is not the relief asked by the cotton farmers.tiwari said.
The vidarbha region has witnessed the more than 20000 r of suicides by debt-ridden farmers in the last ten years of congress-ncp govt. but issue farm suicides is not being addressed due apathy of political parties and negative attitude of babus in the administration as even though state has shown the surplase of rs.400 crore in state budget but failed to relief aid such as food security,health care,food crop incentives free education to ward of distressed cotton farmers in order to stop on going farm suicides in region ,kishore tiwari added. .
Maharashtra govt has not taken any budtory step to help debt trapped vidarbha cotton farmers as "Close to 60 percent farmers in Vidarbha have a landholding of more than two hectares and most of them are in distress on the Maharashtra government's own admission and all such farmers in the region, which has witnessed a large number of suicides by debt-ridden farmers, would be deprived of the benefit announced by central govt "tiwari told..
Pointing out the absence of provisions for increasing farmers' income, price stabilization and incentives for low-cost farming that would have signalled a beginning of the quest for a durable solution to the agrarian crisis, Tiwari also questioned Maharashtra govt,s silence over food security and rural health.
Earlier the annual budget presented by Chidambaram has a farm loan waiver provision of Rs.600 billion intended to extend the benefit to 40 million farmers across the country. The one-time settlement would cover marginal and small farmers whose loans were rescheduled last year. kishor Tiwari's also demanded that a loan waiver up to Rs 50,000 rather than up to two-hectare land holding would have been more appropriate.
"The two-hectare cap would mostly benefit the sugarcane and grape cultivators in western and southern Maharashtra who have smaller land holdings but large-income-yielding agriculture because of the irrigation facility available there," tiwari added.
Kishor tiwari urged UPA Government to restore advance bonus and give rs.2700/- per quintal price as promised in the UPA manifesto. ".
Tiwari said most of the political parties are shedding crocodiles tears over the insult of cotton farmer but they are not talking about finding solution to redress the hardships of the Vidarbha farmers. Presently most of the farmers who are committing suicides are victims of poverty and hunger that has resulted after the economic collapse in the Vidarbha region due ongoing agrarian crisis.
"We demand urgent step to provide food security and health care facilities to these dying farmers before making arguments over farm suicides being agrarian or non-agrarian. Now the time has come to give complete loan waiver and price protection on all agriculture produce from free trade in WTO era to Vidarbha dying farmers", Tiwari added.
Tuesday, March 18, 2008
अत्याधुनिक शाळेचे पद्मश्री डाँ विजय भटकर यांच्या हस्ते उदघाटन
Friday, March 14, 2008
कर्मभुमिच्या गुणगाणात शत्रुघ्न सिन्हाच चुकले काय?
मुंबई - मराठी माणुस, भुमिपुत्र या मुद्यांवर सध्या जे काही चालंतेय त्यात राजकारण नाही. असं छातीठोकपणे कुणी सांगु शकणार नाही. ज्यांच त्यांचं राजकारण ज्याला ज्याला त्याला सखलाभ असो. सामान्य मुंबईकर, मराठी माणुस न भडकता डोकं शांत ठेवुन आहे. त्याबद्दल त्याचं, त्याच्या सहनशिलतेचं कौतुक करायला हवं समुद्राच्या खारट पाण्याशेजारी राहणारा मुंबईकर सडक्या डोक्याचा आहे. असं त्याचं कौतुक होवुनही तो शांत बसतो, याला दादच द्यायला हवी. बेजबाबदारपणे अकलेचे तारे तोडणाय्रा आणि टिआरपी च्या नादात ताळतंत्र सोडलेल्या वृत्तवाहिन्यांना हा मुंबईकर जनतेचा अपमान वाटत नाही काय? तसेच तर त्यांना पत्रकारितेतील मुलतत्वे, मुलभुत शिक्षण नक्कीच नव्याने देण्याची गरज आहे. बातमी ही पवित्र असते, टिप्पणीपासुन मुक्त असते. हे जे काही पत्रकारितेच्या शिक्षणात शिकविले जाते, तेच ही मंडळी विसरली आहे एखाद्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखी हिंदी वृत्तवारहिन्यांच्या सुत्रधारांची आहे. मराठी - बिगर मराठी असा वाद पेटवितांना ते कमालीचे उत्तेजीत होतात. त्यांची जन्मभुमी कुठलीही असो मात्र, कर्मभुमी मुंबईत स्टुडीऒ असुनही ते मुंबईकर झालेत असे त्यांच्या भुमिकेवरून वाटत नाही. त्यांनी नक्कीच शत्रुघ्न सिन्हाकडुन कर्मभुमीच्या बांधिलकीचे धडे घ्यायला हवेत सारे हिंदी भाषीक वृत्तनिवेदक, संकुचीत, भाषीक राजकारण करू पाहत आहेत. अशा उथळ आणि थिल्लर वृत्तवाहिन्यांवर काही काळ बंदी लादण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मुळचे मराठी असलेले मात्र सध्या हिंदी वृत्तवाहिन्यांमध्ये वार्ताहर म्हणुन काम करीत असलेल्या मुलांची केविलवाणी अवस्था झाली आहे. बाँसचा आदेश मानण्याच्या नादात आणि त्यांना खुष करण्यासाठी वस्तुस्थितीशी विसंगत, अवास्तव आणि मातृभुमिशी प्रतारणा करणारे वार्तांकन आपण करीत आहोत, याचे भानही त्या बिचाय्रांना नाही. शत्रुघ्न सिन्हाला मुंबईने मोठे केले. नावारूपाला आणले. त्याने कर्मभुमिला नतमस्तक होवुन तिचे ॠण शब्दात व्यक्त केले तर त्यात कुणाच्याही पोटशुळ उठण्याचे कारण काय? महाराष्ट्रात राहुन तो जय महाराष्ट्र म्हणत असेल तर चुकले कुठे? ३०० नोकय्रांपैकी २७५ बाहेरचे भरल्या जात असतील तर तो भुमिपुत्रांवर अन्याय आहे. हे त्याचे मत याग्यच आहे. कुणी ते नाकारणार आहे काय? शत्रुघ्नला व्यक्तीगत शिवसेना प्रमुखांबद्दल आदर असेल तर त्याला बिहारद्रोही कसे ठरविणार? कुणाही मराठी माणसाला कुणाबद्दलही व्यक्तीगत आदर आणि प्रेमाच्या भावना असु शकत नाही काय? शत्रुघ्नने फक्त कर्मभुमिचे गुणगाण केलेय, जन्मभुमिबद्दल एक अवाक्षरही बोलला नाही, तरिही त्याला चुकीचे ठरविले जातेय! बिहारची परिस्थीती इराक पेक्षाही गंभीर आहे. आणि मुंबई यापुढे अधिक लोंढे सहन करू शकणार नाही, या दोन्हीही बाबी सत्य आहेत. माध्यमांमध्ये सत्य सांगण्याची हिंमत नसेल तर गोबेल्स तंत्राने असत्याचा मारा रेटुन सर्वसामान्यांना निदान संभ्रमित तरी करु नका. मला आश्चर्य वाटते ते शिवसेनेचे! शिवसेना प्रमुखांना वेड्यांच्या ईस्पितळ्यात दाखल करा, असे अकलेचे तारे बिहारी खासदारांनी तोडल्यानंतरही शिवसैनिक शांत राहिला. त्याच्या संयमाचे कौतुकचं करायला हवे. मात्र अबु आझमी आणि वात्रट बिहारी खासदारांना आवळण्याची वेळ आता आली आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे हा सारा वाद पेटविलाय तो म.न.सेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे वैर उध्दव ठाकरेंशी आहे , शिवसेनाप्रमुख त्यांना देवासमान आहेत. असे म्हणतात. मग देवावर चिखलफेक होत असतांना ते गप्प कसे? त्यांच्यावर तर आता भाषण बंदीही नाही. निदान बाळासाहेबांना वाट्टेल ते बोलणाय्रा माथेफिरू बिहारी नेत्यांचा निशेध तर ते नक्कीच करू शकतात ना ! शेवटी जाता जाता कर्मभुमी मुंबईबद्दलच्या आपल्या कृतज्ञतेच्या भावना बिनधास्तपणे व्यक्त करणाय्रा शत्रुघ्नचे अभिनंदन! कृतघ्न मराठी वार्ताहरांनी त्यांच्यापासुन बांध घेतला तरी पुरे!
विक्रांत पाटील मुंबई देशोन्नती
VJAS welcomes Rahul Gandhi's proposal to wide loan waiver scheme to distressed vidarbha farmers
Nagpur-13TH MARCH 2008
VJAS(vidarbha jan andolan samiti) today welcome rahul gandhi's cut motion demand nd to centre that Rs.60k crore loan waiver to wider to vidarbha distressed farmers who are committing suicide since 1997 due huge debt trap as announced loan waiver kept more than 80% cotton farmers out of reach due to 2 hector cap ,it is reported by PTI to day QUOTE
Rahul Gandhi wants changes in loan waiver schemeCongress MP and party general secretary Rahul Gandhi suggested in Parliament on Thursday that there should not be one landholding ceiling to choose farmers whose loans the government proposes to waive, nor should there be a single cut-off date for the loan waiver scheme.
Rahul's speech in the Lok Sabha on Thursday, which touched upon the salient features of the budget and included a number of suggestions, was heard with rapt attention.
Stating that the land ceiling fixed at two hectares in the budget for the loan waiver for poor farmers should be changed, he said: "Land ceiling should be variable on the basis of land productivity".
Rahul also suggested that the cut-off date of June 30 for all farm loan waivers was unfair. "A single cut-off date will unfairly penalise the farmers. A localised cut-off date should be considered," he said, inviting a round of applause.
"There are two distinct voices in India today. One of the voices is easier heard... There is another voice. It is a deeper voice. It is not as loud... These people are no different from those doing well. They ask only to be given a voice," Rahul said, referring to those who have the potential but did not get the opportunity.
"Our policy is not to choose (between the two worlds) but to nurture them together," he said.
The young MP also mentioned the achievements made through the Right to Information Act, National Rural Employment Guarantee Scheme (NREGS), Bharat Nirman, Mid-Day Meal scheme and other government schemes for the people.
On NREGS, he said: "Freedom to work is not a charity but a right".
He also lauded the budget allocations for education and health. Complimenting the prime minister and the United Progressive Alliance (UPA) government for a budget for "aam aadmi" (common man), he praised the Jawaharlal Nehru National Urban Renewal Mission, steps for strengthening Panchayati Raj (local self government) institutions and other schemes
UNQUOTE This is good move by congress party and centre should act soon so that distressed farmers one important issue is addressed, kishor tiwari president of vidarbha jan nadolan samiti informed in a press release.
earlier when Finance Minister P. Chidambaram on 29th feb. announced an agriculture loan waiver in the 2008-09 budget but a farmers' leader here said the move will not help most farmers in the Vidarbha region due to the two-hectare landholding cap. The region has witnessed the maximum number of suicides by debt-ridden farmers in the last few years.
"Close to 60 percent farmers in Vidarbha have a landholding of more than two hectares and most of them are in distress on the Maharashtra government's own admission", said Vidarbha Jan Andolan Samiti leader Kishor Tiwari.
He said all such farmers in the region, which has witnessed a large number of suicides by debt-ridden farmers, would be deprived of the benefit.
"I welcome the largely anticipated budgetary provision nevertheless in as much as a 'head' has been created but cannot help saying that even as a relief it is inadequate for the farmers in Vidarbha," Tiwari told..
Pointing out the absence of provisions for increasing farmers' income, price stabilization and incentives for low-cost farming that would have signalled a beginning of the quest for a durable solution to the agrarian crisis, Tiwari also deplored Chidambaram's silence over food security and rural health.
The annual budget presented by Chidambaram has a farm loan waiver provision of Rs.600 billion intended to extend the benefit to 40 million farmers across the country. The one-time settlement would cover marginal and small farmers whose loans were rescheduled last year.
kishor Tiwari's also demanded that a loan waiver up to Rs 50,000 rather than up to two-hectare land holding would have been more appropriate.
"The two-hectare cap would mostly benefit the sugarcane and grape cultivators in western and southern Maharashtra who have smaller land holdings but large-income-yielding agriculture because of the irrigation facility available there," tiwari added.
Sunday, March 9, 2008
विदर्भात आठ दिवसांत २२ आत्महत्या
visit www.dainikyavatmalnews.com
यवतमाळ (पांढरकवडा) - शेतक-यांच्या कर्जमाफीचे श्रेय केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे सुरू असताना आणि सोनिया गांधी यांना श्रेय देण्यासाठी काँग्रेस मेळाव्यांच्या तयारीत असताना विदर्भात गेल्या आठ दिवसांत २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी यवतमाळ न्युज व विदर्भ न्युज ला कर्जमाफी घोषणेनंतर विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावेच दिली. 'कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे. या धतीर्वर विदर्भातील शेतकरी मेळाव्यात सोनिया गांधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देतील काय, हा खरा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षात काही हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र त्यांच्या कुटुंबांना कोणी नुकसानभरपाई दिली नाही. कर्जमाफीचे श्रेय घेणाऱ्यांनी आत्महत्यांचीही नैतिक जबाबदारी घ्यायला हवी' असे तिवारी म्हणाले.
कर्जमाफीच्या घोषणेनंतर आत्महत्या केलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांची नावे : विजय गोकुळदास झंवर-बेळखेड (अमरावती), रमेश भगवान हिंगणकर-निमखेड बाजार (अमरावती), अमरसिंग भुरसिंग सोळंके-दोनवाडा (अकोला), कोल्हू पैकु फुंडे-बाम्पेवाडा (भंडारा), दुर्गादास देसा पवार-बोरी हजारा (यवतमाळ), नरेंद तोताराम चव्हाण-खापातांडा (नागपूर), सुभाष किसन तायडे-गाजीपूर टाकळी (अकोला), काशीनाथ दगडू वाघमारे-मोंढाळा, (बुलढाणा), संतोष रामचंद उबाळे-उमठा (नागपूर), विठ्ठल नामदेवराव वानखेडे-आमला (अमरावती), दत्तुजी चौधरी-नारा (वर्धा), वासुदेव बांगरे-गिरोली हेटी (गोंदिया), भगवंत फुलझेल-वेणी (वर्धा), हनुमंत चव्हाण-जळगाव (अमरावती), जगन्नाथ लट्ये-कन्हाळ (गोंदिया), ज्योती तंबाखे-चिजगाव (यवतमाळ), संजय ठाकरे-सिंदूरजपा (अमरावती), नागेश घोरपडे-चिंतनवाडी (अकोला), किसन रहाटे-पिंपळकुटी (यवतमाळ), रामदास म्हस्के-पांढरदेव (बुलढाणा), केशव शेळके-आवीर् (वर्धा), किसन उईके-खडकी (नागपूर)
Monday, March 3, 2008
पाटणबोरी रेंज मध्ये हजारो सागवान झाडांची अवैध कत्तल
लाखो रूपयाचे सागवान तस्करांच्या घशात
पांढरकवडा - पांढरकवडा वन विभागाअंतर्गत येत असलेल्या पाटणबोरी रेंज मध्ये हजारो सागवान झाडांची अवैध रित्या कत्तल झाली असुन सागवान तस्करांनी लाखो रूपये किंमतीचे सागवान जंगलातुन रातोरात कटाई करून चोरून नेले आहे. सागवान तस्करांशी रेंज च्या अधिकाय्रांचे अर्थपुर्ण संबंध असल्याने पाटणबोरी येथील रेंजर या गंभीर प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करित असल्याचा आरोप भाजपाचे तालुका सचिव अनिरूध्द बडवे यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपा व भाजयुमोच्या तालुका पदाधिकाय्रांनी जंगलात जावुन सागवान कटाईचे छायाचित्रण करून कटाईच्या प्रमुख दृश्यांची एक सिडी पुराव्यानिशी यवतमाळ येथील मुख्य वनसंरक्षक रामानुज चौधरी यांचेकडे सुपुर्द केली असुन तक्रार दाखल केली आहे. चौधरी यांचे कडुन या प्रकरणाची ७ दिवसाचे आत चौकशी केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे. पांढरकवडा वन विभागातील लाखो रूपये किंमतीचे सागवान कटाईचे मोठे प्रकरण उघडकिस आल्याने वन विभागात एकच खळबळ माजली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटणबोरी रेंज मधिल मांडवी, निंबादेवी खैरी धरमगोटा, सुकही वडवाट कोदोरी कारेगांव व पाटणबोरी बिट मधिल जंगलांमध्ये हजारो सागवान झाडांची कटाई सागवान तस्करांनी केली आहे. परंतु पाटणबोरी येथील रेंजर यांचे सागवान तस्करांसोबत मैत्रीपुर्ण व अर्थपुर्ण संबंध असल्याने ते या प्रकरणाकडे हेतुपुरस्सर दुलर्क्ष करीत आहेत. पाटणबोरी रेंज मधिल जंगल नष्ट होण्याचे मार्गावर आले असुन पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच भाजपाचे तालुका सचिव अनिरूध्द बडवे, भाजयुमो तालुका उपाध्यक्ष राहुल चिंतावार तालुका सरचिटणीस धनंजय ठाकरे, प्रितम नरांजे, सुभाष दरणे, प्रफुल सोयाम, रवि उईके यांचेसह अनेक कार्यकर्त्यांनी जंगलात भेटी दिल्या असता मोठ्या प्रमाणात सागवानाची कटाई आढळुन आली. या प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करून संबंधीत भ्रष्ट अधिकाय्रांवर योग्य कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे पाटणबोरी येथील रेंजर यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना तात्काळ सेवेतुन बडतर्फ करावे अन्यथा भाजपा व भाजयुमो तिव्र आंदोलन छेडेल असा ईशारा अनिरूध्द बडवे, राहुल चिंतावार यांनी दिला आहे.
Sunday, March 2, 2008
विदर्भातील शेतकय्रांना फारसा फायदा नाही. आत्महत्या वाढतील - प्रकाश पोहरे
मुंबई - कर्जमाफीच्या निर्णयाचा विदर्भातील शेतकय्रांना फारसा फायदा होणार नाही. विदर्भात मुख्यता कोरडवाहु शेती असल्याने उत्तर महाराष्ट्र, पश्चीम महाराष्ट्र आणि कोकणच्या तुलनेत सरासरी जमिन धारणा क्षेत्र मोठे आहे. पश्चीम महाराष्ट्र सुमारे ८० टक्के शेतकरी हा पाच एकराखालील शेतीक्षेत्र असलेला अल्प भुधारक आहे. विदर्भात हे प्रमाण अवघे ४० टक्के आहे. पश्चीम महाराष्ट्रात तुलनेने सिंचन फलोत्पादन अशी शेतीची विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर झालेली असुन त्यापोटी कर्जाची उचलंही प्रचंड आहे. विदर्भात मात्र सिंचनाअभावी शेतीतील विकासकामांचे प्रमाण अत्यंत कमी असुन कर्जाचे प्रमाणही तुलनेने नगण्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जागृत लोकप्रतीनीधी शेतीच्या विकासाच्या अनेक योजना राबवुन आपला परिसर सुजलाम सुफलाम केला. विदर्भाच्या हिताच्या दृष्टीने पाच एकरांसोबत किमान दोन लाखापर्यंत कर्ज रक्कमेची मर्यादा घातली असती तर अधिक उत्तम ठरले असते. त्याचा खय्रा अर्थाने विदर्भातील असंख्य शेतकय्रांना फायदा होवुन आत्मरत्याग्रस्त भागाला दिलासा मिळु शकला असता. ऒलिता खालिल बागायतदार शेतकय्रांसाठी पाच एकराची मर्यादा योग्य असली तरी कोरडवाहु शेतकय्रांना कर्जमाफिचा कुठलाही फायदा होणार नाही. परिणामी गोंधळ व नैराश्याची परिस्थीती निर्माण होवुन विदर्भात आणखी महिन्याभरात आत्महत्यांचे प्रणेते प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केली आहे. पोहरे गेली १५ वर्षे शेतकरी आंदोलनात सक्रीय आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाला वाचा फोडुन मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासुन राष्ट्रपतींपर्यंत त्यांनी या विषयाचे गांभीर्य रेटुन धरले. आत्महत्याग्रस्त शेतकय्रांच्या कुटुंबियांना मदतीसाठी उच्च न्यायालयात लढा देवुन अखेर त्यांनी दिलासा मिळवुन दिला. कर्जमुक्तीच्या संदर्भात नवी दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या समोर जेष्ठ नेते मोहन धारिया यांच्या समवेत पोहरे यांनी अडीच तास सदरीकरण करून चर्चा केली होती. त्या चर्चेतील ५ एकरापर्यंतच्या अल्प, अत्यल्पभुधारक शेतकय्रांना कर्जमाफिचा निर्णय अभिनंदनास्पद आहे. मात्र, कोरडवाहु शेतकय्रांना सरसकट कर्जमाफीची मागणी मान्य न केल्याने त्याचे विदर्भातील दुरगामी अतिशय वाईट परिणाम होतील, अशी भितीही पोहरे यांनी व्यक्त केली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांची भेट
पांढरकवडा - (आशिष बडवे) - पतिचे आत्महत्येला दोन वर्षे पुर्ण होवुनही शासनाची मदत मिळाली नाही अशा परिस्थितीत दोन लहान मुलांचे पालन पोषण कसे करावे ही चिंता मला सतत सतावित असल्याची कैफियत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील भाडउमरी येथील आत्महत्या केलेल्या वंदना अनिल शेंडे या विधवेने केंद्रीय पंचायत राज युवक कल्याण व क्रीडामंत्री मणिशंकर अय्यर यांचे पुढे मांडली. नागपुर येथुन कारने त्यांनी सरळ भाडउमरी येथे दोन वर्षापुर्वी आत्महत्या केलेल्या अनिल शेंडे या शेतकय्राची पत्नी वंदना शेंडे हिचे घर गाठले व तिचे सात्वन करून तिच्याविषयी माहिती जाणुन घेतली. माझे पती अनिल शेंडे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी आमचेवर ८५ हजार रूपये कर्ज होते त्यात बँकेचे १५ हजार रूपये व ७० हजार रूपये खाजगी सावकारांचे होते असे वंदना शेंडे हिने सांगितले. साडेतिन एकर शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करित असतांना कर्जाचे ऒझे सतत वाढत चालले होते. त्यामुळे माझे पती सतत चिंतीत राहत होते. ज्वारी गहु यासारखी कुटुंबाची पालन पोषण करणारी धान्यांची पिके घेण्याऐवजी आपण कापसाचे पिक कर्ज बाजारी होत असतांना सुध्दा का घेत होता अशी विचारणा मणिशंकर अय्यर यांनी करताच कर्जाची परतफेड करता यावी म्हणुन कापसाचे पिक घेत होतो परंतु सतत तिन वर्षे नापिकी झाल्याने त्यांनी आत्महत्या केली माझे पती मरून दोन वर्षे पुर्ण झालीत परंतु शासनाकडुन मला कुठलिही मदत मिळाली नाही. पंतप्रधान पँकेज अंतर्गत १० हजार रूपयाची तोडकी मदत मिळाली की जो चेकही बाउन्स झाला. वंदना शेंडे या विधवेच्या दोन बालकांना पाहुन त्यांचे मन गहिवरले त्यांनी लगेच मुलांना मांडीवर बसवुन घेत त्यांची विचारपुस केली. यावेळी त्याच गावात आत्महत्या केलेल्या नंदा भेंडारे या विधवा महिलेची देखिल मंत्र्यांनी आस्थेने विचारपुस केली. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आपण जर नोंद केली तर आपणास १५ दिवसात काम मिळते हे आपणास माहिती आहे की नाही अशी विचारणा केली असता त्यांनी ती माहिती नसल्याचे सांगितले. आत्महत्या करण्यांमागची काही सामाजीक कारणे आहेत काय? असा प्रश्न उपस्थीत केला असता सामाजिक कारणांपेक्षा आर्थिक कारणांमुळे आत्महत्या होत असल्याची माहिती गावकय्रांनी दिली. अर्थंसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकय्रांचे कर्ज माफ केले असल्याचे मंत्र्यांनी सांगताच या विधवांनी या कर्ज माफीवर नापसंती व्यक्त केली. २ हेक्टर म्हणजे ५ एकर पर्यंतच्या शेतकय्रांना कर्ज माफी मिळत आहे तेव्हा माझ्या पतिने आत्महत्या केली परंतु माझेजवळ सात एकर जमिन आहे तेव्हा मला या कर्जमाफिचा काहिच फायदा झाला नाही तेव्हा आत्महत्या केलेल्या विधवांचे कर्ज मग ती कितीही एकर जमिन असो माफ करावे अशी मागणी या विधवा महिलांनी केली. मणिशंकर अय्यर यांनी या समस्या शांतपणे ऐकुण घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंत्र्यांसोबत विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, पत्रकार पी साईनाथ, मोहन मामिडवार, कृषी भुषण अरूण ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.
पांढरकवडा नगर परिषदेचा १२ कोटींचा अर्थसंकल्प
पांढरकवडा - पांढरकवडा नगर परिषदेचे सन २००८ - २००९ चे २ कोटी ८ लक्ष शिल्लकीचे अंदाज पत्रक आज सादर केले. ११.७६ कोटी रूपयाच्या अर्थसंकल्पात क्रीडा संकुल, शिक्षण व आरोग्य, रस्ते सौंदर्यीकरण आणि नागरी सुविधांवर भर दिला जाणार आहे. सभागृहात एकमताने या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सन २००७ - २००८ चे सुधारीत व सन २००८ - २००९ च्या खर्चाची तरतुद असणारा ९ कोटी ६८ लाख रूपयाचा अर्थसंकल्प आजच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये शासकीय निधी व नगर परिषदेचा राखिव निधी वजा जाता हे अंदाज पत्रक २ कोटी ८ लक्ष शिल्लकीचे राहणार आहे. नगराध्यक्ष भा़ऊराव मरापे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.
Sunday, February 24, 2008
भिवरी गांव शेतकरी आत्महत्या मुक्त
अमरावती - ७ वर्षापुर्वी गठीत करण्यात आलेल्या शाश्वत कृषी कृती परिषदेने पारंपारिक शेती ला सुनियोजीत करून विदर्भात जवळपास ३ लाख शेतकय्रांशी आपले नाते जोडले आहे. त्याचप्रमाने दर्यापुर तहसिल मध्ये येणाय्रा भिवरी गांवाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा दावा केला आहे. या संघटनेचे विदर्भ प्रांतीय निमंत्रक संजय भगत ने सरकारकडे पारंपारिक शेतीवर लक्ष केंद्रीत करण्याची मागणी केली आहे. संजय भगत यांनी एक पत्रकार परिषद घेवुन त्यांनी पारंपारिक शेती विषयी माहिती देवुन सरकारला हा सल्ला दिला. पारंपारिक शेतीत रासायनिक औषधांऐवजी नैसर्गीक खत व किटकनाशक वापरल्या जाते असे सांगितले. त्यांनी पुढे सांगितले की शाश्वत कृषी कृती परिषदेच्या स्थापनेचा उद्देश शेतकय्रांचे जिवन बदलविणे हा आहे. भिवरी गावातील सर्वच शेतकरी या अभियानात सहभागी झाले आहेत.
Sunday, February 3, 2008
धारणीनजीक (जि. अमरावती) ट्रॅक्टर उलटून सात ठार; ११ जखमी
धारणीनजीक (जि. अमरावती) ट्रॅक्टर उलटून सात ठार; ११ जखमी
धारणी (जि. अमरावती) - मध्य प्रदेशातील देडतलई येथे धान्यविक्रीसाठी जात असलेला ट्रॅक्टर ३५ किलोमीटर अंतरावरील नारदू गावाजवळ उलटून, झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार; तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (ता. तीन) सकाळी नऊच्या सुमारास घडला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन गंभीर जखमींना धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने, प्रवाशांचे प्राण वाचू शकले. रविवारी देडतलई येथे आठवडी बाजार भरतो. हिराबंबई येथील ३५ शेतकरी धान्याच्या पोत्यांसह गावातील शिकारी धांडे यांचा ट्रॅक्टर (एमएच-२७-९२७६) घेऊन बाजाराला जात होते. चालक कुंवरसिंग जयराम धांडे हा ट्रॅक्टर चालवीत होता. विशेष म्हणजे, त्याच्याकडे ट्रॅक्टर चालविण्याचा परवानादेखील नव्हता. धारणीपासून ३५ किलोमीटर अंतरावरील नारदू गावाजवळच्या चढावावर या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटून अपघात झाला. अंगावर धान्याची पोती कोसळून, त्याखाली दबून, सात जणांचा मृत्यू झाला; तर अन्य ११ जण गंभीर जखमी झाले. मृतकांमध्ये लक्ष्मण मांगी चतूर (वय ६०), समोती रामदास झापलकर (वय ३०), नीतेश रामदास सावलकर (वय १२), रेखा भारत जावरकर (वय १५), दुर्गाबाई नाना जावरकर (वय ३२), सर्व रा. चिचघाट, मुन्नीबाई मनाजी जावरकर (वय ५०), रा. हिराबंबई, संजय रामकिशन जावरे (वय १२), रा. मांजरूद (म. प्र.) यांचा समावेश आहे. जखमींमध्ये तुळशीबाई हरिकिशन जावरकर (वय ३०), रा. मांजरूद (म.प्र.), जानकीबाई शिकारी धांडे (वय ५५), अमर सुभाष धांडे (वय १४), समोती रामा चतूर (वय ३०), फालतू मनाजी जावरकर (वय ४५), अमित रूपचंद धांडे (वय १५), आकाश नानासिंग दुदुया (वय २५), मसरीबाई सौदानसिंग (वय ३५), पीयूष सौदानसिंग (वय ६), सौदानसिंग रामसिंग (वय ३५) व सुभाष किसन रावत (वय ३५), सर्व रा. हिराबंबई यांचा समावेश आहे. जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.dainikyavatmalnews.com
www.pressindia.wordpress.com
www.newsindiapress.blogspot.com
Saturday, February 2, 2008
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना अन्नसुरक्षा द्या
दहा दिवसात उत्तर द्या - उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश
(आशिष बडवे )
नागपूर, ता. २ - विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा देण्यात यावी, अशी विनंती विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज न्यायालयास केली. त्यावर शासनाने दहा दिवसांत उत्तर सादर करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. .....शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे लक्ष वेधणारी जनहित याचिका उच्च न्यायालयातील न्या. ए. पी. लवांदे आणि न्या. अरुण चौधरी यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आली आहे. याचिकेवर यापूर्वी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने शासनाला विविध आदेश दिले आहेत. तर केंद्र व राज्य शासनाच्या पॅकेजनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत, याकडे याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले आहे. तेव्हा शेतकऱ्यांना तातडीने कशा स्वरूपात मदत करता येईल, त्याकरिता सूचना सादर कराव्यात, असे याचिकाकर्त्यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार, विदर्भ जनआंदोलन समितीने काही शिफारशी न्यायालयाला केल्या आहेत. त्यात केंद्र व राज्य शासनाच्या पॅकेजची अंमलबजावणी करण्याकरिता वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनकडे पुरसे अधिकारी आणि कर्मचारी नाहीत, असे नमूद करण्यात आले आहे. तर येथे कायमस्वरूपी संचालकांनी नियुक्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तर अंत्योदय योजनेत शेतकऱ्यांना नियमितपणे धान्यपुरवठा करण्यात यावा, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नोव्हेंबर २००७ पर्यंत ३,६७९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, तर त्यापैकी केवळ १४,८८७ शेतकऱ्यांनाच शासनाने मदत दिली आहे. त्यामुळे २,०६४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाने नाकारल्या आहेत. त्यामुळे या आत्महत्या शासनाने का नाकारल्या, त्याचे स्पष्टीकरण शासनाने द्यावे, अशी मागणी केली आहे. शासकीय वेबसाईटनुसार ९२ हजार ४५६ शेतकरी कुटुंबांमध्ये विविध आजार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्याकरिता तातडीने आरोग्य सेवा पुरविणे आवश्यक आहे. तर चार लाख ३४ हजार २९१ कुटुंब तणावाखाली आहेत. त्यांना या मानसिक तणावातून मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, विशेषत: सार्वजनिक वितरण प्रणालीतून त्यांना धान्यपुरवठा करणे आवश्यक आहे, असे न्यायालयास सुचविण्यात आले आहे. या शिफारशींवर शासनाने दहा दिवसांत उत्तर सादर करावे, असा आदेश देण्यात आला आहे. याचिकेवर २९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
Thursday, January 31, 2008
विदर्भात ११ शेतक-यांच्या आत्महत्या
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2746292.cms
नागपूर - कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात गेल्या ४८ तासात ११ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात एकूण ४७ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. विदर्भात कृषीसंकटामुळे अनेक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. २००६ साली पंतप्रधांनानी जाहीर केलेल्या तीन हजार कोटी रूपयांच्या पॅकेजमुळे शेतक-यांना फारसा लाभ झाला नसून आत्महत्या करणा-यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
राज्य सरकार एकीकडे शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीविषयीच्या प्रस्तावावर विचार करते. दुसरीकडे मात्र साहूकार आणि खाजगी बॅंकांची शेतक-यांकडून जबरदस्तीने कर्जवसूली सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारने अशा कर्जवसूलीवर त्वरीत बंदी आणावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. १९९५ ते २००६ दरम्यान महाराष्ट्रात ३६,४२८ शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत येणा-या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे.
गेल्या ४८ तासाच विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची नावे खालीलप्रमाणे. १) मुरलीधर शिरभाते २) सुनील अजनकर ३) सुरेश साबळे (वर्धा जिल्हा) , ४) दिगंबर शामसुंदर, ५) रुपराव आवारे ६) संतोष अडाम (अमरावती जिल्हा), ७) धोंडू खरात (गोंदिया जिल्हा), ८) प्रकाश इंगळे (बुलढाणा जिल्हा), ९) राम कहाकढे (यवतमाळ) १०) प्रभाकर करंजेकर (चंद्रपूर जिल्हा) ११) सदानंद फुरंगे अकोला
Wednesday, January 30, 2008
दहा लाखांच्या रुई गाठी खाक
उमरखेड (जि.यवतमाळ), ता. ३० - आपला तालुका जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या आवारात ठेवलेल्या रुईच्या गठाणीला आज (ता. ३०) दुपारी लागलेल्या आगीत १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीत शंभर गाठी जळून खाक झाल्या.
गोळी झाडून पोलिस शिपायाने केली पत्नीची हत्या
गडचिरोली, ता. ३० - क्षुल्लक वादावरून संतप्त झालेल्या पोलिस शिपायाने आपल्या पत्नीची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना आज (ता.३०) संध्याकाळी पाचच्या सुमारास आनंदनगर येथे घडली. अलका संजय कोरडे(३०) असे मृत महिलेचे नाव असून, पती संजयला आरमोरी पोलिसांनी वघाळा या गावी नाट्यमयरीत्या अटक केली आहे. ......
Thursday, January 24, 2008
मंगळावर महिला सदृश्य जीव आढळला.
Wednesday, January 23, 2008
बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Tuesday, January 22, 2008
शिवसेनाप्रमुख म्हणजे सूर्य!
राज्यातील निवडणुकांबाबत प्रश्ान् विचारता ते म्हणाले, निवडणुका व्हायच्या त्या होतच असतात. जनतेला कोण विचारतो? आम्ही मात्र महाराष्ट्राच्या भल्यासाठी नेहमी आंदोलनाच्या पवित्र्यात असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून रान उठविण्यासाठी आम्ही मेळावे घेतले. युएलसीविरोधात आंदोलन केले. जनतेच्या प्रत्येक प्रश्ानसाठी शिवसेना रस्त्यावर उतरते. याचा अर्थ शिवसेना जनतेसोबत आहे. सरकारच्याविरोधात आम्ही असेच आग लावत जाणार आहोत, असेही ते म्हणाले. मराठी माणसांचे प्रश्ान् मांडण्यात आणखी एक वाटेकरी निर्माण झाल्याचा प्रश्ान् विचारला असता मनसेचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसासाठी शिवसेनेने नेहमीच लढा दिला असून शिवसेनेसोबत मराठी माणूस काल, आज होता आणि उद्याही राहील. मात्र, हे वाटेकरी व त्यांची वाटमारी पुढे टिकणार नाहीत. तत्पूवीर् शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, या बैठकीत महिलांविरोधात अत्याचार वाढल्याबद्दल, यूएलसी रद्द करून मराठी माणसाला मुंबईबाहेर फेकल्याबद्दल, मुस्लिमांचे लांगूलचालन केल्याबद्दल निषेधाचा तसेच कामगारहित आणि कर्जमुक्तीसाठी संघर्ष करण्याचा ठराव संमत करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शन आजपर्यंत जसे मिळाले, तसेच ते कायम मिळावे आणि त्यांनी यापुढेही शिवसेनेचे नेतृत्व करावे, असा ठरावही सर्वानुमते मांडल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड अधिक शिरोडकर यांनी काम पाहिले. बूट घाला जाडजूड! कार्याध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सुचवले. पाच वर्षांपूवीर्च्या बैठकीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले होते. तो धागा पकडत उद्धव, जोशी यांना म्हणाले, तुम्ही जाडजूड बूट घाला, नाही तर तुम्हालाही पायावर धोंडा मारून घेतला, असे म्हणण्याची वेळ येईल. (उद्धव यांचे नाव सुचवून आपण पायावर धोंडा पाडून घेतला, अशी खंत राज व्यक्त करतात) पण काळजी करू नका. हा धोंडा तुमच्या पायावर नाही तर विरोधकांच्या माथी पडणार आहे!
Monday, January 21, 2008
Number of farmers in India overstated: Survey
Wednesday, January 9, 2008
www.dainikyavatmalnews.com
EDITOR
DAINIK
YAVATMAL NEWS
WEBSITE IS www.dainikyavatmalnews.com
Email address is info@dainikyavatmalnews.com
ashishbadwe@gmail.com
ashish_badwe@yahoo.co.in
Contact No is - 9422167205, 9890397205