Thursday, January 31, 2008

विदर्भात ११ शेतक-यांच्या आत्महत्या

विदर्भात ११ शेतक-यांच्या आत्महत्या
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2746292.cms
नागपूर - कर्जबाजारीपणाला कंटाळून विदर्भात गेल्या ४८ तासात ११ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात एकूण ४७ शेतक-यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. विदर्भात कृषीसंकटामुळे अनेक कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत आहेत. २००६ साली पंतप्रधांनानी जाहीर केलेल्या तीन हजार कोटी रूपयांच्या पॅकेजमुळे शेतक-यांना फारसा लाभ झाला नसून आत्महत्या करणा-यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
राज्य सरकार एकीकडे शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीविषयीच्या प्रस्तावावर विचार करते. दुसरीकडे मात्र साहूकार आणि खाजगी बॅंकांची शेतक-यांकडून जबरदस्तीने कर्जवसूली सुरूच आहे. त्यामुळे राज्य सरकारने अशा कर्जवसूलीवर त्वरीत बंदी आणावी अशी मागणी विदर्भ जनआंदोलन समितीने केली आहे. १९९५ ते २००६ दरम्यान महाराष्ट्रात ३६,४२८ शेतक-यांनी आत्महत्या केली असल्याचे केंद्रीय गृह मंत्रालय अंतर्गत येणा-या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालात म्हटले आहे.
गेल्या ४८ तासाच विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतक-यांची नावे खालीलप्रमाणे. १) मुरलीधर शिरभाते २) सुनील अजनकर ३) सुरेश साबळे (वर्धा जिल्हा) , ४) दिगंबर शामसुंदर, ५) रुपराव आवारे ६) संतोष अडाम (अमरावती जिल्हा), ७) धोंडू खरात (गोंदिया जिल्हा), ८) प्रकाश इंगळे (बुलढाणा जिल्हा), ९) राम कहाकढे (यवतमाळ) १०) प्रभाकर करंजेकर (चंद्रपूर जिल्हा) ११) सदानंद फुरंगे अकोला

1 comment:

Gangadhar Mute said...

शेतक-यांच्या आत्महत्यांच्या समस्येवर सद्ध्या बरीच चर्चा आणि उहापोह सुरु आहे. या समस्येची उकल करतांना अनेक मान्यवरांनी शोधलेली कारणे आणि सुचविलेले उपाय बघितले तर "शेतकरी मरतोय तर मरू द्या पण त्याच्या आत्महत्येची कारण-मीमांसा करणे आणि उपाय सुचविणे बंद करा" अशा स्वरुपाची आत्मक्लेशी प्रतिक्रिया शेतकरी समाजमनात उमटल्याशिवाय राहत नाही. कारण शेतक-यांच्या आत्महत्येच्या दु:खद वेदनांपेक्षा यांच्या प्रतिक्रिया अधिक वेदनादायी असतात.
शेतकरी आळशी किंवा कामचुकार आहे असे वाटते त्या सर्व मान्यवर तज्ज्ञांनी आयुष्यात एकदातरी सलगपणे काही दिवस शेतकरी समाजासोबत (पाटलाच्या वाड्यात किवा राजकीय पुढा-याच्या बंगल्यात नव्हे ) घालवायला हवे. त्याखेरीज शेतकरी कशाला म्हणतात,तो कसे जीवन जगतो आणि किती कष्ट करतो याचा अनुभव येणे अशक्य आहे. ४-५ तास किंवा अर्धा-एक दिवस शेतक-याच्या झोपडीत घालवल्याने जर कुणाला शेतकरी समजला असे वाटत असेल तर खुशाल वाटू दे,पण हा देश आपण कोण्या आळशी,अलायक तज्ज्ञांचा हातात सोपवला असा प्रश्न जर कोण्या ग्यानबाला पडला,तर त्याच्याशी वाद घालता येईल,मुजोरीही करता येईल पण त्या ग्यानबाच्या प्रश्नाचे समर्पक निराकरण करता येईल.?
गंगाधर मुटे
For More Please visit
http://vidarbhashetkarisabha.blogspot.com/