लोकमंगल पतसंस्थेतर्फे ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज
सोलापूर दि।१६ राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशनने हमी घेतल्यास परतफेडीच्या तत्वावर लोकमंगल पतसंस्थेतर्फे बार्शी तालुक्यातील ५०० बचत गटांना २ कोटी रूपयांपर्यंतचे कर्ज तात्काळ मंजूर केले जाईल¸ असे आश्वासन लोकमंगल उद्योगसमुहाचे संस्थापक खा।सुभाष देशमूख यांनी दिले। या महिलांनी आर्थिकदृष्टया सक्षम बनले पाहिजे आणि ज्या कामासाठी कर्ज घेणार आहे त्याच कामासाठी त्या कर्जाचा वापर करावा असे आवाहन खा।सुभाष देशमूख यांनी यावेळी केले। बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणाहून राष्ट्रीय महिला बचत गट फेडरेशन सारखा देशव्यापी महासंघ होत असुन त्या माध्यमातून बार्शी तालुक्याचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे ¸अशा लोकसंग्रहयूक्त महासंघाच्या माध्यमातून महिला बचत गट व पुरूष बचत गटांच्या मानवी शक्तीचे योग्य नियमन करूण उत्पादन अथवा व्यवसाय करणार आहेत व जे बचत गट उत्पादने करण्यास इच्छूक नाहीत अशांना ट्रेडिंग एजन्सीचे काम देणार असल्याचे खा। सुभाष देशमूख यांनी सांगितले।यावेळी फेडरेशनच्या प्रस्तावावर खा। सुभाष देशमूख यांनी २ कोटी रूपयांचे कर्ज परतफेडीच्या तत्वावर मंजुर केले। या फेडरेशन तर्फे सुविधा सेवा केंद्राची सुरूवात केली असून शासकीय योजना २ महिन्यात सर्वसामान्य लोकांपर्यंत प्रत्येक गावामध्ये पोहोचविण्याचे आश्वासन फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालाक श्री।जीवनदत्त अरगडे यांनी सांगितले।यावेळी बार्शी तालुक्यातील १०० जणांचे शिष्टमंडळ खा। सुभाष देशमूख यांना भेटण्यास आले होते।
No comments:
Post a Comment