दहा लाखांच्या रुई गाठी खाक
उमरखेड (जि.यवतमाळ), ता. ३० - आपला तालुका जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या आवारात ठेवलेल्या रुईच्या गठाणीला आज (ता. ३०) दुपारी लागलेल्या आगीत १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आगीत शंभर गाठी जळून खाक झाल्या.
गोळी झाडून पोलिस शिपायाने केली पत्नीची हत्या
गडचिरोली, ता. ३० - क्षुल्लक वादावरून संतप्त झालेल्या पोलिस शिपायाने आपल्या पत्नीची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना आज (ता.३०) संध्याकाळी पाचच्या सुमारास आनंदनगर येथे घडली. अलका संजय कोरडे(३०) असे मृत महिलेचे नाव असून, पती संजयला आरमोरी पोलिसांनी वघाळा या गावी नाट्यमयरीत्या अटक केली आहे. ......
No comments:
Post a Comment