visit www.dainikyavatmalnews.com
यवतमाळ (पांढरकवडा) - शेतक-यांच्या कर्जमाफीचे श्रेय केंदीय कृषिमंत्री शरद पवार यांना देण्यासाठी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे सुरू असताना आणि सोनिया गांधी यांना श्रेय देण्यासाठी काँग्रेस मेळाव्यांच्या तयारीत असताना विदर्भात गेल्या आठ दिवसांत २२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी यवतमाळ न्युज व विदर्भ न्युज ला कर्जमाफी घोषणेनंतर विदर्भात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावेच दिली. 'कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू आहे. या धतीर्वर विदर्भातील शेतकरी मेळाव्यात सोनिया गांधी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन देतील काय, हा खरा प्रश्न आहे. गेल्या पाच वर्षात काही हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र त्यांच्या कुटुंबांना कोणी नुकसानभरपाई दिली नाही. कर्जमाफीचे श्रेय घेणाऱ्यांनी आत्महत्यांचीही नैतिक जबाबदारी घ्यायला हवी' असे तिवारी म्हणाले.
कर्जमाफीच्या घोषणेनंतर आत्महत्या केलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांची नावे : विजय गोकुळदास झंवर-बेळखेड (अमरावती), रमेश भगवान हिंगणकर-निमखेड बाजार (अमरावती), अमरसिंग भुरसिंग सोळंके-दोनवाडा (अकोला), कोल्हू पैकु फुंडे-बाम्पेवाडा (भंडारा), दुर्गादास देसा पवार-बोरी हजारा (यवतमाळ), नरेंद तोताराम चव्हाण-खापातांडा (नागपूर), सुभाष किसन तायडे-गाजीपूर टाकळी (अकोला), काशीनाथ दगडू वाघमारे-मोंढाळा, (बुलढाणा), संतोष रामचंद उबाळे-उमठा (नागपूर), विठ्ठल नामदेवराव वानखेडे-आमला (अमरावती), दत्तुजी चौधरी-नारा (वर्धा), वासुदेव बांगरे-गिरोली हेटी (गोंदिया), भगवंत फुलझेल-वेणी (वर्धा), हनुमंत चव्हाण-जळगाव (अमरावती), जगन्नाथ लट्ये-कन्हाळ (गोंदिया), ज्योती तंबाखे-चिजगाव (यवतमाळ), संजय ठाकरे-सिंदूरजपा (अमरावती), नागेश घोरपडे-चिंतनवाडी (अकोला), किसन रहाटे-पिंपळकुटी (यवतमाळ), रामदास म्हस्के-पांढरदेव (बुलढाणा), केशव शेळके-आवीर् (वर्धा), किसन उईके-खडकी (नागपूर)
No comments:
Post a Comment