सूर्य कधीही म्हातारा होत नाही. तो रोज उगवतो...रोज मावळतो. सूर्य आहे म्हणूनच आपण सगळे आहोत. शिवसेनाप्रमुखांचेही असेच आहे. त्यांच्या मार्गदर्शनाची आपल्याला आवश्यकता असून आतापर्यंत जसे ते मिळाले, तसेच ते पुढेही मिळत राहणार आहे, असे सांगत पुन्हा निवड झालेले शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या निवृत्तीविषयी उठलेल्या वावड्यांना सोमवारी पूर्णविराम दिला. शिवसेनाभवन येथे पार पडलेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची फेरनिवड झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे आणि शिवसैनिकांचे आभार मानले. 'गेल्या पाच वर्षांत अनेक संकटे आली. विरोधकही वाढले. मात्र, जनता आणि शिवसैनिकांच्या प्रेमाच्या पाठबळावर यातून बाहेर पडलो. हे प्रेम असेच कायम ठेवा. तुमच्या विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही', अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. 'संघटना असेल तर दहा वेळेला सत्ता आणता येईल, पण संघटना नसेल तर काहीच नाही. त्यामुळे येथून पुढे फक्त संघटना, संघटना आणि संघटनाच,' असे ते म्हणाले.
राज्यातील निवडणुकांबाबत प्रश्ान् विचारता ते म्हणाले, निवडणुका व्हायच्या त्या होतच असतात. जनतेला कोण विचारतो? आम्ही मात्र महाराष्ट्राच्या भल्यासाठी नेहमी आंदोलनाच्या पवित्र्यात असतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरून रान उठविण्यासाठी आम्ही मेळावे घेतले. युएलसीविरोधात आंदोलन केले. जनतेच्या प्रत्येक प्रश्ानसाठी शिवसेना रस्त्यावर उतरते. याचा अर्थ शिवसेना जनतेसोबत आहे. सरकारच्याविरोधात आम्ही असेच आग लावत जाणार आहोत, असेही ते म्हणाले. मराठी माणसांचे प्रश्ान् मांडण्यात आणखी एक वाटेकरी निर्माण झाल्याचा प्रश्ान् विचारला असता मनसेचा उल्लेख न करता उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठी माणसासाठी शिवसेनेने नेहमीच लढा दिला असून शिवसेनेसोबत मराठी माणूस काल, आज होता आणि उद्याही राहील. मात्र, हे वाटेकरी व त्यांची वाटमारी पुढे टिकणार नाहीत. तत्पूवीर् शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले, या बैठकीत महिलांविरोधात अत्याचार वाढल्याबद्दल, यूएलसी रद्द करून मराठी माणसाला मुंबईबाहेर फेकल्याबद्दल, मुस्लिमांचे लांगूलचालन केल्याबद्दल निषेधाचा तसेच कामगारहित आणि कर्जमुक्तीसाठी संघर्ष करण्याचा ठराव संमत करण्यात आला. शिवसेनाप्रमुखांचे मार्गदर्शन आजपर्यंत जसे मिळाले, तसेच ते कायम मिळावे आणि त्यांनी यापुढेही शिवसेनेचे नेतृत्व करावे, असा ठरावही सर्वानुमते मांडल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक अधिकारी म्हणून अॅड अधिक शिरोडकर यांनी काम पाहिले. बूट घाला जाडजूड! कार्याध्यक्षपदासाठी उद्धव ठाकरे यांचे नाव शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सुचवले. पाच वर्षांपूवीर्च्या बैठकीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले होते. तो धागा पकडत उद्धव, जोशी यांना म्हणाले, तुम्ही जाडजूड बूट घाला, नाही तर तुम्हालाही पायावर धोंडा मारून घेतला, असे म्हणण्याची वेळ येईल. (उद्धव यांचे नाव सुचवून आपण पायावर धोंडा पाडून घेतला, अशी खंत राज व्यक्त करतात) पण काळजी करू नका. हा धोंडा तुमच्या पायावर नाही तर विरोधकांच्या माथी पडणार आहे!
No comments:
Post a Comment