Friday, April 4, 2008

मातृभुमिच्या पांढरकवडा पानाला ६ एप्रील पासुन प्रारंभ

मातृभुमिच्या पांढरकवडा पानाला ६ एप्रील पासुन प्रारंभ
www.dainikyavatmalnews.com
अकोला येथुन प्रसिध्द होणाय्रा दै. मातृभुमी या वृत्तपत्रात येत्या ६ एप्रील पासुन गुढी पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पांढरकवडा ग्रिनसिटी या विशेष पानाला सुरुवात होत आहे. अमरावती येथुन प्रसिध्द होणाय्रा एका वृत्तपत्रात यापुर्वी हे पान संपादक अनिरूध्द बडवे हे प्रसिध्द करीत होते या पानाला केळापुर तालुक्यातच नव्हे तर संपुर्ण जिल्हयात मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग लाभला होता. मात्र यवतमाळ येथील व्यवस्थापनासोबत निर्माण झालेल्या वादामुळे अनिरूध्द बडवे यांनी त्या वृत्तपत्राची ही सेवा बंद केली. मात्र तालुक्यातील वाचकांच्या आग्रहाखातर आता हे विशेष पान लोकप्रीय दै. मातृभुमीत वाचावयास मिळणार आहे. तसेच हे पान इंटरनेट वरही पाहता येणार आहे त्याकरिता वाचकांना फक्त www.dainikyavatmalnews.com या वेब न्युज पेपरवर सर्फिंग करून (log on करून ) पांढरकवडा या पर्यायावर माउस क्लिक करावा लागणार आहे. अधिक माहिती करीता ९४२२१६७२०५ या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
NEWS INDIA
NEWS INDIA PRESS

No comments: