Tuesday, June 17, 2008

कर्ज वसुल करतांना ते वडिलांच्या धाकाने वसुल करावेत - अँड.शरद बनसोडे

कर्ज वसुल करतांना ते वडिलांच्या धाकाने वसुल करावेत - अँड.शरद बनसोडे
सोलापूर दि।१६ :– सर्वसामान्य माणासाच्या विकासासाठी त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून पतपुरवठा करणे गरजेचे आहे। मात्र पतसंस्थेने कर्ज देताना आईच्या ममतेने द्यावे व वसुल करताना वडिलांच्या धाकाने करावे असे मत सिनेअभिनेते अॅड। शरद बनसोडे यांनी व्यक्त केले। लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या २२ व्या वागदरी शाखेचे उद्‌घाटन अॅड।शरद बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते आप्पासाहेब चौगुले हे होते। व्यासपीठावर खासदार सुभाष देशमुख, माजी आमदार महादेव पाटील, जि।प।सदस्य आनंदराव तानवडे, पंचायत समितीचे सदस्य धोंडाप्पा यामानी, पंचायत समितीचे सदस्य मल्लिनाथ हत्ते, भाजपा अध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक रविकांत पाटील, दूध डेअरीचे सरव्यवस्थापक रामचंद्र गवळी, शिवशरण कोटे, पंचप्पा कल्याणशेट्टी, वागदरीच्या सरपंच सिंधूताई सोनकवडे, पतसंस्थेचे चेअरमन सुरेश साठे, व्हा।चेअरमन संभाजीराव पाटील, यशवंत साठे आदीं मान्यवर उपस्थित होते। प्रास्ताविक चेअरमन सुरेश साठे यांनी केले। यावेळी माजी जि।प।सदस्य पंचप्पा कल्याणशेट्टी , माजी आमदार महादेव पाटील यांनी विचार व्यक्त केले। पतसंस्थेचे संस्थापक खासदार सुभाष देशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आता सरकार काही देईल याची वाट पाहत बसू नका। आपण आपला विकास करून घ्या। मिळविलेल्या चार पैशातून काही तरी बचत करा। गरिबीमुळे समाज व्यसनाकडे वळत आहे आणि व्यसनातून पुन्हा गरिबी निर्माण होत आहे। हे दुष्टचक्र कुठेतरी थांबले पाहिजे। आता कुणाच्या तरी हाताकडे पाहण्यापेक्षा अनुदानाची वाट पाहण्यात वेळ घालविण्यापेक्षा तो वेळ शेतीसाठी द्या, व्यवसायासाठी द्या व स्वत:ची प्रगती करून घ्या असे त्यांनी सांगितले। मी अक्कलकोट तालुक्यात पतसंस्थेची शाखा काढतो आहे तेव्हा या मतदारसंघातून मला निवडणूक लढवायची आहे असे नाही। मी विकास कामे करताना कधीच मतदारसंघाचा विचार केला नाही। राजकीय व्यक्तींनी बारा महिने राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे असा सल्ला त्यांनी यावेळी दिला। अध्यक्षीय भाषणात आप्पासाहेब चौगुले यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेवून सर्वसामान्यसाठी काम करणारा नेता असे खासदार देशमुख यांचे वर्णन केले। कार्यक्रमास मल्लिनाथ शेळके, मल्लिनाथ हत्ते, शिवशरण वाले, शिवशरण जोजन, यशवंत धोगडे, विजयकुमार पाटील, प्रकाश कोमानी, प्रविण शहा, सचिन कल्याणशेट्टी, अतुल कोकाटे, संतोष मिरगे, डॉ।शेट्टेर, श्रीशैल नंदर्गी, मल्लिनाथ मसुती आदी पतसंस्थेचे सर्व संचालक व सल्लागार तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते। सुत्रसंचालन अनिल सर्जे यांनी केले। आभारप्रदर्शन संचालक मुरारी शिंदे यांनी केले।

No comments: