Saturday, June 7, 2008

मोनसान्टो बिटी काँटन भारतीय शेती करीता घातक



नागपुर - ७ जुन २००८

विदर्भ जनआंदोलन समितीच्या ग्रुप ने केलेले मेली बग वरील सर्वेक्षण धक्कादाक ठरले आहे. सर्व प्रकारची झाडे आणि शेती पिकांवर मिली बग झपाट्याने आक्रमण करीत आहे. एम. एन. सी. मोनसान्टो कंपनी निर्मीत बि.टी. काँटन बियाण्यांचीच मिली बग भेट असल्याचे दिसुन आले आहे. आणि येणाय्रा खरिप हंगामात याचा मिली बग शेत पिकांवर सर्वत्र दिसुन येईल असे विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. हा विषाणु फक्त कापुस उत्पादकांकरीताच घातक नसुन सर्व कडधान्य व भाजी पिकांकरीताही तेवढाच घातक असल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे. त्याकारणाने तिवारी यांनी भारताचे पंतप्रधान मनमोहनसिंग यांचेकडे एका शिपारशीतुन मोनसान्टो बियाण्यांवर प्रतिबंध आणण्याचा आग्रह केला आहे. विदर्भातील कापुस उत्पादक कर्ज संकटाला तोंड देत आहे. अशात कापुस बियाणे कृषी संकट वाढविणारे ठरावेत याकडेही किशोर तिवारी यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपल्या तक्रारीतुन केला आहे. अहवालावरून लंडन च्या विज्ञान संस्थेने केलेल्या अभ्यासात मोनसेन्टो भारताकरिता घातक असल्याचे म्हटले आहे. १३ मे २००८ मधील आपल्या लेखात बिटी काँटन बियाण्यांची घातकता स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की जैविक बिटी काँटन बियाणे भारतात कापुस (सीस २७) आणि आंध्र प्रदेशात कापुस (सिस २९) या बियाण्यांच्या रोपांचा केलेल्या अभ्यासात मिली बग आढळुन आला आहे. याचे छायाचित्र घेण्यात आले आहे ही बियाणे वेगवगळ्या कंपन्यांमध्ये आहेत विदर्भात गंगा, कावेरी, ब्रम्हा, आणि बन्नी या सर्वांच्या प्लान्ट्सचे लेबल बोलगार्ड आहे. या प्लान्टमध्ये बिटी येण्यापुर्वी मिली बगचे विषाणु कुठेही नव्हते. तिवारी म्हणतात दोन वर्षापुवी चिन येथील काँटनचा अभ्यास केला तेथील अभ्यास प्लाँट चे छायाचित्र व चित्रीकरण पाहीले आणि आता म्हणता येईल की विदर्भातही मिली बगचा शिरकाव झाला आहे. आता जेव्हा कापसाचे पिक मरेल तेव्हा मिली बग इतर पिकांवर आक्रमण करेल. जुनच्या मध्यात शेतकरी नविन कापुस पीक घेण्याच्या तयारीत असतो परंतु त्या पुर्वी बग हा दुपटीने वाढलेला असेल. त्याने काँग्रेस जवळील तंबाखु आणि जवळपासचे बगीच्यांमध्ये तो पसरेल याच वेळी मी मृत रोपांचाही अभ्यास केला. काँटन सिडच्या नविन जनरेशन मध्ये हायब्रिड सिडस् सर्व पुरुष असल्याचे आढळले थोडक्यात ही बियाणे टरमिनेटर आहेत आणि १९९३ मध्ये वरिष्ठ सरकारी कमेटीने त्यांना प्रोव्हाइड केले आहे. या लेखा मागील उद्देश एवढाच की माझा शेतकय्रांना एवढाच सल्ला आहे की त्यांनी एफ २ बियाणे जसे हायब्रीड. त्यातुन रोपं तर उगवतात परंतु ते सर्व पुरूष प्रजातीचे असतात किशोर तिवारींनी यावरील विस्तृत माहिती पंतप्रधानांकडे पाठविली आहे.

No comments: