गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांच्या आत्महत्या
पांढरकवडा - गेल्या ४ दिवसात २७ शेतकय्रांनी आत्महत्या केल्याची माहिती विदर्भ जनआंदोलन समितीने दिली आहे. ही लज्जास्पद बाब असल्याची प्रतीक्रीया विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी व्यक्त केली आहे. केंद्र सरकाने कर्जमाफिची घोषणा करूनही शेतकय्रांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहित यामुळे कर्जमाफीची घोषणा पुर्णपणे फोल ठरली आहे. या घोषणेचा फायदा पश्चीम महाराष्ट्रातीलच शेतकय्रांना होतो आहे. विदर्भातील शेतकरी मात्र या बाबतीतही नागावल्याच गेला आहे. किशोर तिवारी यांनी पुन्हा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावरून सरकारला पुन्हा धारेवर धरले विदर्भाचे बाळासाहेब ठाकरे अशी ख्याती प्राप्त असलेल्या तिवारींनी ४ दिवसात २४ शेतकय्रांच्या आत्महत्या म्हणजे लाजीरवाणी बाब असल्याची तिखट प्रतिक्रीया यवतमाळ न्युज, न्युज इंडीया जवळ व्यक्त केली.
1 comment:
हा फ़ारच गंभीर प्रश्न आहे.
Post a Comment