Thursday, January 24, 2008

मंगळावर महिला सदृश्य जीव आढळला.


मंगळावर महिला सदृश्य जीव आढळला.


आशिष बडवे - २४ जानेवारी

पांढरकवडा (नागपुर) - जीवसृष्टीच्या नावाखाली नेहमीच चर्चेत राहिलेला पृथ्वीसदृश्य ग्रह मंगळावर नासाच्या यानाने महिला सदृश्य जीवाचे छायाचित्र टिपले आहे. त्यामुळे मंगळावर जिवसृष्टी असल्याच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे. छायाचित्रातील तो जिव नग्नावस्थेतील महिलाच असल्याचा नासाचा दावा आहे द डेली मेल या वृत्तपत्राने दिले आहे. नासाच्या सहाय्याने तसे छायाचित्रही प्रकाशीत करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपुर्वीच मंगळ ग्रहावर बर्फाचे ढग आढळले होते. त्यामुळे आता मंगळ ग्रहाबाबत अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या ग्रहाचा व्यापक अभ्यास करण्याचा प्रयत्न नासा तर्फे केल्या जाणार आहे.


मंगळावर मानवाचे अस्तित्व


न्यूयॉर्क, ता. २३ - मंगळावर मानवाचे अस्तित्व असल्याचे दर्शविणारे छायाचित्र "नासा'ला पाठविण्यात आल्याने मंगळाचे गूढ अधिकच वाढले आहे. ......मंगळावरील एका टेकडीवर एक विवस्त्र महिला चालत असल्याचे छायाचित्र "नासा'ला पाठविण्यात आल्याचे वृत्त "डेली मेल'ने दिले आहे. या महिलेचे हात ताणलेले आहेत. याबाबत "नासा'ने अधिकृतपणे कोणतीही टिपण्णी केलेली नाही. या छायाचित्रात दिसणारी महिला खरी आहे की मंगळावरील एखादा दगड आहे यावर "नासा'ने काहीही सांगितले नाही. एका वेबसाईटच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. हे छायाचित्र पाहिल्यावर आमचा विश्वासच बसला नाही. विवस्त्र स्वरूपातील एक परजीव पाहून आम्हाला धक्‍का बसला, असे एका नागरिकाने या वेबसाईटला पाठविलेल्या मेलमध्ये म्हटले आहे. फ्रान्सच्या शास्त्रज्ञांनी काही दिवसांपूर्वीच मंगळावर कोरड्या बर्फाचे ढग असल्याचे म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हे वृत्त अधिकच गूढ निर्माण करणारे आहे. मंगळावरील बर्फाचे ढग काही वेळा इतके दाट होतात, की त्यामुळे मंगळावर गडद सावली पडते. मंगळावर कार्बन-डाय-ऑक्‍साईड असल्याचा पुरावा प्रथमच देणारे छायाचित्र या शास्त्रज्ञांनी दिले आहे.

No comments: