विदर्भातील शेतकय्रांना फारसा फायदा नाही. आत्महत्या वाढतील - प्रकाश पोहरे
मुंबई - कर्जमाफीच्या निर्णयाचा विदर्भातील शेतकय्रांना फारसा फायदा होणार नाही. विदर्भात मुख्यता कोरडवाहु शेती असल्याने उत्तर महाराष्ट्र, पश्चीम महाराष्ट्र आणि कोकणच्या तुलनेत सरासरी जमिन धारणा क्षेत्र मोठे आहे. पश्चीम महाराष्ट्र सुमारे ८० टक्के शेतकरी हा पाच एकराखालील शेतीक्षेत्र असलेला अल्प भुधारक आहे. विदर्भात हे प्रमाण अवघे ४० टक्के आहे. पश्चीम महाराष्ट्रात तुलनेने सिंचन फलोत्पादन अशी शेतीची विकासात्मक कामे मोठ्या प्रमाणावर झालेली असुन त्यापोटी कर्जाची उचलंही प्रचंड आहे. विदर्भात मात्र सिंचनाअभावी शेतीतील विकासकामांचे प्रमाण अत्यंत कमी असुन कर्जाचे प्रमाणही तुलनेने नगण्य आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जागृत लोकप्रतीनीधी शेतीच्या विकासाच्या अनेक योजना राबवुन आपला परिसर सुजलाम सुफलाम केला. विदर्भाच्या हिताच्या दृष्टीने पाच एकरांसोबत किमान दोन लाखापर्यंत कर्ज रक्कमेची मर्यादा घातली असती तर अधिक उत्तम ठरले असते. त्याचा खय्रा अर्थाने विदर्भातील असंख्य शेतकय्रांना फायदा होवुन आत्मरत्याग्रस्त भागाला दिलासा मिळु शकला असता. ऒलिता खालिल बागायतदार शेतकय्रांसाठी पाच एकराची मर्यादा योग्य असली तरी कोरडवाहु शेतकय्रांना कर्जमाफिचा कुठलाही फायदा होणार नाही. परिणामी गोंधळ व नैराश्याची परिस्थीती निर्माण होवुन विदर्भात आणखी महिन्याभरात आत्महत्यांचे प्रणेते प्रकाश पोहरे यांनी व्यक्त केली आहे. पोहरे गेली १५ वर्षे शेतकरी आंदोलनात सक्रीय आहेत. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या प्रश्नाला वाचा फोडुन मुख्यमंत्री, पंतप्रधानांपासुन राष्ट्रपतींपर्यंत त्यांनी या विषयाचे गांभीर्य रेटुन धरले. आत्महत्याग्रस्त शेतकय्रांच्या कुटुंबियांना मदतीसाठी उच्च न्यायालयात लढा देवुन अखेर त्यांनी दिलासा मिळवुन दिला. कर्जमुक्तीच्या संदर्भात नवी दिल्ली येथे पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या समोर जेष्ठ नेते मोहन धारिया यांच्या समवेत पोहरे यांनी अडीच तास सदरीकरण करून चर्चा केली होती. त्या चर्चेतील ५ एकरापर्यंतच्या अल्प, अत्यल्पभुधारक शेतकय्रांना कर्जमाफिचा निर्णय अभिनंदनास्पद आहे. मात्र, कोरडवाहु शेतकय्रांना सरसकट कर्जमाफीची मागणी मान्य न केल्याने त्याचे विदर्भातील दुरगामी अतिशय वाईट परिणाम होतील, अशी भितीही पोहरे यांनी व्यक्त केली आहे.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांची भेट
पांढरकवडा - (आशिष बडवे) - पतिचे आत्महत्येला दोन वर्षे पुर्ण होवुनही शासनाची मदत मिळाली नाही अशा परिस्थितीत दोन लहान मुलांचे पालन पोषण कसे करावे ही चिंता मला सतत सतावित असल्याची कैफियत यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील भाडउमरी येथील आत्महत्या केलेल्या वंदना अनिल शेंडे या विधवेने केंद्रीय पंचायत राज युवक कल्याण व क्रीडामंत्री मणिशंकर अय्यर यांचे पुढे मांडली. नागपुर येथुन कारने त्यांनी सरळ भाडउमरी येथे दोन वर्षापुर्वी आत्महत्या केलेल्या अनिल शेंडे या शेतकय्राची पत्नी वंदना शेंडे हिचे घर गाठले व तिचे सात्वन करून तिच्याविषयी माहिती जाणुन घेतली. माझे पती अनिल शेंडे यांनी ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी आमचेवर ८५ हजार रूपये कर्ज होते त्यात बँकेचे १५ हजार रूपये व ७० हजार रूपये खाजगी सावकारांचे होते असे वंदना शेंडे हिने सांगितले. साडेतिन एकर शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसाबसा करित असतांना कर्जाचे ऒझे सतत वाढत चालले होते. त्यामुळे माझे पती सतत चिंतीत राहत होते. ज्वारी गहु यासारखी कुटुंबाची पालन पोषण करणारी धान्यांची पिके घेण्याऐवजी आपण कापसाचे पिक कर्ज बाजारी होत असतांना सुध्दा का घेत होता अशी विचारणा मणिशंकर अय्यर यांनी करताच कर्जाची परतफेड करता यावी म्हणुन कापसाचे पिक घेत होतो परंतु सतत तिन वर्षे नापिकी झाल्याने त्यांनी आत्महत्या केली माझे पती मरून दोन वर्षे पुर्ण झालीत परंतु शासनाकडुन मला कुठलिही मदत मिळाली नाही. पंतप्रधान पँकेज अंतर्गत १० हजार रूपयाची तोडकी मदत मिळाली की जो चेकही बाउन्स झाला. वंदना शेंडे या विधवेच्या दोन बालकांना पाहुन त्यांचे मन गहिवरले त्यांनी लगेच मुलांना मांडीवर बसवुन घेत त्यांची विचारपुस केली. यावेळी त्याच गावात आत्महत्या केलेल्या नंदा भेंडारे या विधवा महिलेची देखिल मंत्र्यांनी आस्थेने विचारपुस केली. राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत आपण जर नोंद केली तर आपणास १५ दिवसात काम मिळते हे आपणास माहिती आहे की नाही अशी विचारणा केली असता त्यांनी ती माहिती नसल्याचे सांगितले. आत्महत्या करण्यांमागची काही सामाजीक कारणे आहेत काय? असा प्रश्न उपस्थीत केला असता सामाजिक कारणांपेक्षा आर्थिक कारणांमुळे आत्महत्या होत असल्याची माहिती गावकय्रांनी दिली. अर्थंसंकल्पात अर्थमंत्र्यांनी शेतकय्रांचे कर्ज माफ केले असल्याचे मंत्र्यांनी सांगताच या विधवांनी या कर्ज माफीवर नापसंती व्यक्त केली. २ हेक्टर म्हणजे ५ एकर पर्यंतच्या शेतकय्रांना कर्ज माफी मिळत आहे तेव्हा माझ्या पतिने आत्महत्या केली परंतु माझेजवळ सात एकर जमिन आहे तेव्हा मला या कर्जमाफिचा काहिच फायदा झाला नाही तेव्हा आत्महत्या केलेल्या विधवांचे कर्ज मग ती कितीही एकर जमिन असो माफ करावे अशी मागणी या विधवा महिलांनी केली. मणिशंकर अय्यर यांनी या समस्या शांतपणे ऐकुण घेतल्या व त्या सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी मंत्र्यांसोबत विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी, पत्रकार पी साईनाथ, मोहन मामिडवार, कृषी भुषण अरूण ठाकरे आदी प्रामुख्याने उपस्थीत होते.
पांढरकवडा नगर परिषदेचा १२ कोटींचा अर्थसंकल्प
पांढरकवडा - पांढरकवडा नगर परिषदेचे सन २००८ - २००९ चे २ कोटी ८ लक्ष शिल्लकीचे अंदाज पत्रक आज सादर केले. ११.७६ कोटी रूपयाच्या अर्थसंकल्पात क्रीडा संकुल, शिक्षण व आरोग्य, रस्ते सौंदर्यीकरण आणि नागरी सुविधांवर भर दिला जाणार आहे. सभागृहात एकमताने या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सन २००७ - २००८ चे सुधारीत व सन २००८ - २००९ च्या खर्चाची तरतुद असणारा ९ कोटी ६८ लाख रूपयाचा अर्थसंकल्प आजच्या बैठकीत मांडण्यात आला. त्यामध्ये शासकीय निधी व नगर परिषदेचा राखिव निधी वजा जाता हे अंदाज पत्रक २ कोटी ८ लक्ष शिल्लकीचे राहणार आहे. नगराध्यक्ष भा़ऊराव मरापे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.

No comments:
Post a Comment