Tuesday, October 14, 2014

भाजपा विरूध्द सगळे !

भाजपा विरूध्द सगळे !
गेल्या काही वर्षातील चित्र होते की काँग्रेस विरूध्द काही पक्ष त्यात भाजपा हा पक्ष त्याचे नेतृत्व करीत असायचा त्यातुन युती आणि आघाड्याचे युग सुरू झाले आणि पाहता पाहता काँग्रेसचा प्रमुख विरूधी पक्ष म्हणुन भाजपा झपाट्याने पुढे आली. काँग्रेस शासनप्रणालीला कंटाळलेल्या जनतेने भाजपाला पर्याय नेमुन सत्तेवर आणले आणि गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश छत्तीसगड आदी राज्यांमध्ये भाजपाने आपले कर्तृत्व सिध्दही केले आहे त्यामुळेच आज गुजरात आणि मध्यप्रदेशात भाजपाकडे एकहाती सत्ता असुन त्या प्रदेशांचा विकासदर वाढलेला आहे रस्त्यांची अवस्था उत्तम असुन हे प्रदेश जवळपास भारनियमन मुक्त आहेत कृषी क्षेत्रातही या प्रदेशांनी चांगलीच प्रगती केली आहे त्यामुळे येथे जनता भाजपालाच निवडुन देत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. भाजपाचे हे उत्तम कार्य पाहता देशातील संपुर्ण जनतेने काँग्रेसचे भ्रष्ट शासन उखडुन फेकत 30 वर्षानंतर काँग्रेसेत्तर पक्षाला म्हणजेच भारतीय जनता पार्टीला बहुमत दिले. आणि जनतेने मोदींच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट केला. सत्तेवर येताच भाजपाने धडाडीचे निर्णय घेत विकासकामांना गती दिली. विकासदर वाढविला त्यामुळे आज रूपया मजबुत झाल्याचे चित्र दिसत आहे 68 वरून रूपया डाँलरच्या तुलनेत 60 वर आला तर पेट्रोलचे दर 6 रूपये कमी झाले. महागाईही नियंत्रीत होत असुन वस्तुंचे दर स्थिर करण्यात मोदी सरकारने यश मिळविले आहे याचाच धसका ईतर राजकीय पक्षांनी घेतला असुन मोदी सरकारने त्याचा कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर देशात ईतर पक्षांचे काय होईल याची धास्तीच त्यांनी घेतली असल्याचे दिसुन येत आहे. त्याचा प्रत्यय आता महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकांमध्ये येवु लागला आहे. दि. 15 आँक्टोंबर 2014 ला होवु घातलेल्या निवडणुकीत सर्वपक्ष विरूध्द भाजपा हेच चित्र पहावयास मिळत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष एकेकाळचा विरोधी पक्ष राहिलेल्या व 15 वर्षे राज्यात सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेण्याचे सोडुन केवळ मोदी व भारतीय जनता पार्टीवरच तोंडसुख घेतांना दिसलेत त्याच मित्रपक्ष राहिलेला शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आघाडीवर दिसलेत. याचे एकमेव कारण म्हणजे राज सर्वच राजकीय पक्षांचे अस्तित्व पणाला लागले असल्याचे राजकीय विश्लेषक मानतात. ज्या मुद्यांवर निवडणुक व्हावयास पाहिजे होती जनतेला ज्याची अपेक्षा होती ते विषय राजकीय पक्षांनी आपल्या जाहिर सभांमधुन बाजुला ठेवुन केवळ मोदींवर व भारतीय जनता पार्टीवर तोंडसुख घेतले. जनतेला व लोकसभा निवडणुकीत मोदीवर विश्वास प्रकट केलेली जनता यात अनभिज्ञ आहे असे नाही जनतेने हा प्रकार अनुभवला भाजपाला एकटे पाडण्यात व निवडणुकी नंतर पोष्ट पोल अलायंस बनवुन भाजपाला सत्तेपासुन दुर रोखण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा. शरद पवार यांनी सुरू देखील केले आहेत. त्यांनी त्यांच्या मते जातीयवादी पक्ष असलेल्या शिवसेनेची स्तुती करून त्याचे संकेतही दिले आहेत तर कट्टर वैरी राहिलेल्या शिवसेनेविषयी तोंड सुख घेणारे व तोंडसुख घेण्याची एकही संधी लोकसभा निवडणुकीत न गमाविलेल्या मनसेच्या राज ठाकरेंनी देखील शिवसेनेसंदर्भात आपुलकीचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे भाजपा बहुमतापासुन दुर राहिल्यास या त्रिकुटाच्या हाती सत्ता जाणार अरे राजकीय विश्लेषक विविध वाहिन्यांवर आपले मत मांडतांना दिसत आहेत मात्र केंद्रात भाजपा आणि राज्यात दुसरे सरकार राहिले तर त्याचा काही अंशी परिणाम राज्याच्या विकासावर होईल का अशी भिती देखील व्यक्त केल्या जात आहे तसे पाहिले तर मोदी सरकार ने सबका साथ सबका विकास हा नारा सरकार स्थापन होण्यापुर्वीच दिला होता आणि ते त्याप्रमाणेही वागतही आहेत मात्र मोदींची देशात आणि विदेशात वाढत असलेली लोकप्रियता आणि भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले वजन ईतर राजकीय पक्षांसाठी अस्तित्वाची स्थिती निर्माण करणारी असल्याचा मतप्रवाह राजकीय पक्षांमध्ये निर्माण झाल्याने महाराष्ट्रात भाजपा विरूध्द सगळे ही स्थिती पहावयास मिळत आहे
आशिष बडवे
कार्यकारी संपादक
दैनिक सुपर भारत
८३८००१९००२

1 comment:

sharayu said...

'म्हणून हा मेला, वामनचा चेला, मोठमोठ डोळं वासतोय ग, काहीतरी घोटाळा दिसतोय् ग'