Monday, April 11, 2011
विचार करू तरी किती?
विचार करू तरी किती? यावर्षी म्हणे पुन्हा करतो शेती शेतीचे नाव काढताच वाटते भिती कारण शेतीनेच केली बेकार गती आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती? ।।१।। यावर्षी तरी पिक होईल म्हणे अती म्हणुन मागील वर्षी केली होती शेती परंतु कापसाच्या झाल्या फक्त वाती आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती? ।।२।। शेतात नुसते कष्ट करती सोयाबिनचे भरेल वाटले होते पोती पण, पोत्याची झाली अर्धी भरती आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती? ।।३।। शेतात पिक सगळेच लावती परंतु आमचे पिक गडी, ढोरे खाती कर्जाचे डोंगर चढतच जाती तुम्हीच सांगा विचार करू तरी किती? ।।४।। केव्हा पैसा येईल हाती असे, कर्जदार कर्जाचे गीत गाती कर्जामुळे तुटत आहे नाती आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती?।।५।. शेती म्हणताच भरते धास्ती यावर्षी तरी होईल का कायमची वस्ती देवाजवळ लावतो मी पणती आता तुम्हीच सांगा विचार करू तरी किती?।।६।। बंद करा शेतीची भटकंती कारण गहाण ठेवायला नाही संपत्ती आता घ्या निवृत्तीची विश्रांती हीच आम्हा सर्वांची विनंती ।।७।। रचियता अभिनव बडवे पांढरकवडा ९४०३७४०६५७
Subscribe to:
Posts (Atom)