Friday, May 9, 2008
लोकमंगल बँक व्याख्यानमाला
सोलापूर दि।६ मे २००८ हसणे आणि प्रेम यांचा मोठा संबंध आहे। प्रेम वाढले की हसणे वाढते आणि हसणे वाढले की प्रेम वाढते।त्यामुळे आयुष्यात आनंद हवा असेल तर लहान मुलांप्रमाणे जगा।सध्या जीवनातील हास्य हरवले आहे¸ त्यामुळे आनंदी जिवण जगण्यासाठी हसणे महत्वाचे असल्याचे मत मकरंद टिल्लु (पुणे)यांनी व्यक्त केले। लोकमंगल बँकेच्या दशकपूर्ति समारंभानिमित्त हिराचंद नेमचंद वाचनालयातील अँम्पी थियटरमध्ये आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत टिल्लु बोलत होते। हास्यावलोकन हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता।आपल्या व्याख्यानात मनमुराद हसवत त्यांनी जीवनातील हसण्याचे महत्त्व सांगितले । सध्या धावपळीच्या युगात प्रत्येक जण तणावाखाली आहे। हसायलाही वेळ नाही। आपल्यातील जिवंतपणा हरवला आहे । अशा परिस्थितीमध्ये हास्ययोग शास्त्रीय दृष्टीने देखील महत्त्वाचा आहे। सध्याच्या वृत्तमालिकांमध्ये स्त्रियांचे चुकीचे दर्शन घडविले जात आहे ¸ याला रोखण्याची गरज असल्याचे टिल्लू म्हणाले।उन्हाळा एन्जॉय करा टिल्लू यांनी आपल्या व्याख्यानातून हास्याचे धबधबे निर्माण केले। पावसामध्ये भिजून आपण पावसाळा एन्जॉय करतो। थंडीमध्ये आइस्क्रीम खाण्यासाठी जाऊन हिवाळा एन्जॉय करतो मग उन्हाळयाबाबत तिरस्कार का हो ? असे म्हणत ते म्हणाले ¸ डोक्यातून घाम गळताना किती छान वाटतय असे समजून उन्हाळा एन्जॉय करा ¸ असे टिल्लू यांनी सांगताच उन्हाळयात हास्याचे फवारे उडाले।
Subscribe to:
Posts (Atom)